'या' किल्ल्यावर पर्यटकांची आर्थिक लूट

'या' किल्ल्यावर पर्यटकांची आर्थिक लूट

पुनदखोरे । वार्ताहर | Punadkhore

साल्हेर किल्ल्यावर (Salher Fort) पर्यटकांची (tourist) संयुक्त वन व्यवस्थापन समिती (Forest Management Committee) व वनविभागामार्फत (Forest Department) बनावट पावत्या बनवून

आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून पर्यटकांची आर्थिक लूट करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कळवण (kalwan) येथील अ‍ॅड. विनायक पगार यांनी वनविभागाकडे केली आहे.

पाच दिवसापूर्वी कळवण येथील शिवप्रेमी साल्हेर किल्ला (Salher Fort) पाहण्यासाठी गेले असता वन परिक्षेत्र ताहाराबाद (Forest Zone Taharabad) यांच्या अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती (Forest Management Committee) मार्फत प्रतिव्यक्ती 100 रुपये शुल्क आकारण्यात येऊन बनावट पावत्या देण्यात आल्या.

दोन वेगवेगळ्या शुल्क पावत्या संबंधितानकडून देण्यात आल्या. पावतींवर कुठल्याही प्रकारचा शिक्का नसल्याने सदरील पावती ही कायदेशीर आकारणी केलेल्या प्रवेश पावतीच्या बनावट छापून पर्यटक (tourist) व शिवप्रेमींकडून पैसे उकळविण्याचा गोरखधंदा संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनविभागाने (Forest Department) सुरु केला आहे.

किल्ल्यावर जाण्याकरिता कुठे ही दिशादर्शक फलक, पारंपरिक मार्ग, प्राचीन मार्ग, खुणांनी दर्शविण्यात आलेले नाही. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहांची कोणती सुविधा उपलब्ध नसून कोणतीही तरतूद केलेली नाही. संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागामार्फत संगमताने शिवप्रेमी, गडप्रेमी व पर्यटकांकडून पदाचा गैरवापर करून

स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे फसवणूक करून शासनाच्या परिपत्रकाचा दुरूपयोग करून खोटे सरकारी दस्त पावत्या बनवून पर्यटकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. याबाबत वनविभागाने या प्रकरणाची चौकशी दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड.विनायक पगार यांनी आपल्या तक्रारी अर्जातून केली आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनविभागामार्फत गडप्रेमींची खोट्या पावत्या छापून लूट केली जात आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष राणी भोये यांच्याकडे वन कर्मचारी संदीप गायकवाड यांच्या खोट्या पावत्या दाखवून तसेंच तक्रार करून देखील त्यांनी सदरील आर्थिक लुटीस अभय दिले असून यामुळे त्यांचे संगणमत असल्याचे सिद्ध होत आहे.

- अ‍ॅड. विनायक पगार, कळवण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com