नाशकात हजारो कुटुंबं यंदा दिवाळीपासून दूरच
Diwali NashikDiwali Nashik

नाशकात हजारो कुटुंबं यंदा दिवाळीपासून दूरच

पंचाळे | वार्ताहर Panchale

कोरोनाचा प्रादुर्भाव (corona outbreak) एसटी कर्मचाऱी (ST Workers), शेतकरी (Farmers), विद्यार्थी (Students) यांच्या झालेल्या आत्महत्या, रस्ते व इतर अपघात (Road Accidents), मृत्यू संख्येत झालेली वाढ यामुळे यावर्षीच्या दिवाळी सणावर दुःखाचे सावट असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंबांमध्ये यंदा दिवाळी साजरी होणार नसल्याचे चित्र आहे....

नाशिक जिल्ह्यात कोरोनाकाळात जवळपास आठ हजारापेक्षा अधिक रुग्ण दगावले. त्यामुळे अनेक कुटुंबातील लहान मुलांचे आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा हे कोरोना आजारामुळे निधन झाले.

हजारो कुटुंबातील बालके अनाथ झाली आहेत. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे अनेकांच्या जीवनाचा आलेख बदलला असून जीवनाची गती मंदावली आहे. जीवनातील रस आनंद उत्साह एका क्षणात मावळला असून अनेकांच्या जीवनाचा मार्ग बदलला आहे.

अनेकांच्या डोळ्यासमोर अंधकारमय जीवन असून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या व्यक्तीच्या उपचारावर खर्च करताना कुटुंब कर्जबाजारी बनले.

एसटीच्या लॉकडाऊनमुळे (Lock down) झालेल्या अनियमित फेऱ्या, फ्लॅटचे हप्ते, बँकेचे कर्ज, कर्मचाऱ्यांना असणारा अपुरा पगार, महागाईने गाठलेला कळस, त्यामुळे कुटुंबाची गुजराण करताना कर्त्या माणसाची होणारी ससेहोलपट.

त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याच्या घटना घडल्या. परंतु हा विचार न करता आज मितीस अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा मार्ग अवलंबिला आहे.

अतिवृष्टी, दुष्काळ, कौटुंबिक कलह, महागाई, कर्जबाजारीपणा, दुष्काळ पिकांना मिळणारा कमी भाव, खत व कीटकनाशके यांच्या वाढलेल्या किमती त्यामुळे शेतीचा मशागतीचा खर्चही न सुटल्याने झालेला खर्च यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे.

त्यांच्या या आत्महत्येच्या मार्गामुळे त्यांच्या कुटुंबाची पूर्ण वाताहात झाली. असून अनेक माता-भगिनी मोलमजुरी करून व आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या स्मृती मनात ठेवून जीवन कंठत आहे.

आत्महत्यांच्या मदतीबाबत शासनाचे किचकट नियम असल्याने अनेक आत्महत्यांच्या बाबतीत शासनाकडून मदत नाकारली जाते. त्यामुळे अनेक कुटुंब आपल्या नशिबाचे भोग समजून नशिबाला दोष देत अनेक आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या कुटुंब सदस्य आपल्या संसाराचा गाडा स्वतः ओढत आहे. त्यात त्यांची दमछाक होत आहे.

या कालावधीत यांच्या कुटुंबामध्ये आपत्ती अथवा अपघात झाले अनेक निराधार झालेल्या व्यक्तींना मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी आधार देण्याचा प्रयत्न होत आहे. अशा या परिस्थितीत हा दिवाळीचा सण नेहमीप्रमाणे येणारे दिवसाप्रमाणे जाणार आहे. त्याची धग मात्र कुटुंबातील व्यक्तींना सोडून गेलेल्या व्यक्तीची उणीव व जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही असेच चित्र सध्यातरी दिसते आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com