अखेर खोकरीपाडाला पोहचले पाणी

अखेर खोकरीपाडाला पोहचले पाणी

हरसूल । वार्ताहर | Harsul

गेल्या अनेक वर्षे पेठ तालुक्यातील (peth taluka) खोकरीपाडा या पाणी टंचाईग्रस्त (Water scarcity) दुर्गम गावात सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने अखेर पाणी पोहोचले आहे. या जलयोजनेचे मोठ्या जल्लोषात मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

आदिवासी भागातील (tribal area) खेड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी एसएनएफ (SNF) आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट (Lions Club of Nashik Corporate) या दोन संस्थांच्या वाहक परिश्रमातून ही योजना आकाराला आली आहे. या सोहळ्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष विनय बिरारी (Lions Club President Vinay Birari), सचिव नंदकिशोर लाहोटी,

सेवाकार्य अध्यक्ष अजय सानप, लायन अनंत पाटील, लायन मनिष जाधव, लायन कैलास पवार आदी पदाधिकारी तसेच एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, समन्वयक रामदास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गावाच्या वेशीवर ग्रामस्थांनी गावकर्‍यांचे वाजत गाजत स्वागत करून जलकुंभाचे पूजन केले.

वाद्य व नृत्याच्या मिरवणुकीत गावात पाण्याच्या हंड्यांची मिरवणूकही काढण्यात आली. एसएनएफकडून या गावच्या पाणी समस्येची (water issue) माहिती कळल्यावर आम्ही जसे त्वरित पाण्यासाठी सहकार्य केले. यापुढे इतर उपक्रमांसाठीही करू असे आश्वासन यावेळी अध्यक्ष बिरारी यांनी दिले. तर काळजीपूर्वक वापर करून ग्रामस्थांनी पाण्याची बचत करावी असा सल्ला सचिव अ‍ॅड. नंदकिशोर लाहोटी यांनी दिला. गावात पाणी आल्यावर गाव हागणदारीमुक्त व्हावे आणि गावाने वृक्ष संवर्धन करावे अशी अपेक्षा एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले.तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी सुत्रसंचलन तर पोपट भूसारे यांनी आभार मानले. यावेळी बारकू रिजड, पोपट भूसारे, नामदेव खोटरे, ग्रामसेवक पखाने, छबूनाथ चौधरी, प्रशांत गर्जे, पुंडलिक टोकरे, नामदेव भांगरे, लक्ष्मण रिंजड, वसंत पाडवी, पंढरीनाथ दरोडे, जिजाबाई कुंभारे, येणूबाई रिजड, विजय भांगरे, विनोद खोटरे, संदिप डगळे यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, महिला उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com