अखेर 'त्या' महिलेचा मृतदेह सापडला

अखेर 'त्या' महिलेचा मृतदेह सापडला

मुल्हेर । वार्ताहर | Mulher

ढगफुटीसदृष्य (cloudburst) मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू झाल्याने शेतातील काम सोडून घराकडे निघालेली 30 वर्षीय शेतमजुर महिला नाल्यास आलेल्या

पुराच्या पाण्याचा (flood) अंदाज न आल्याने वाहून गेली. तब्बल 24 तासानंतर या बेपत्ता महिलेचा मृतदेह (Body of missing woman) आरम नदीपात्रात (Aram River) बगरीचा पाडा येथे आढळून आल्याने पायरपाडा येथे शोककळा पसरली आहे.

आदिवासी (tribal) पश्चिम पट्ट्यातील साल्हेर (salher) परिसरातील पायरपाडा गाव परिसरात ढगफुटीसदृष्य मुसळधार पर्जन्यवृष्टी (heavy rain) झाल्याने नदीनाले ओसंडून वाहू लागले. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शेतीकामास गेलेले आदिवासी शेतकरी (farmers), शेतमजुर पावसाचे विक्राळ स्वरूप लक्षात घेत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शेतीची कामे थांबवून घराकडे निघाले होते.

पायरपाडा येथील रंजना महाजन (30) ही शेतमजुर महिला देखील काम थांबवून घराकडे आपल्या शेळीस दोरीने पकडून निघाली होती. मात्र मुसळधार पावसाने (heavy rain) नाल्यास आलेल्या मोठ्या पुराचा रंजनास अंदाज न आल्याने ती नाल्यातून उतरत असतांना पुराच्या पाण्याचे (flood) वेगवान प्रवाहामुळे शेळीसह वाहून गेली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी पुरात वाहून गेलेल्या रंजना महाजन यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला.

या घटनेची माहिती मिळताच बागलाणचे आ. दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांच्यासह जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पायरपाडा, भिकारसोंडा भागात असलेल्या सिमेंट बंधार्‍यात तसेच राक्षसकडा म्हणून प्रसिध्द असलेल्या धबधब्याच्या खालच्या बाजूस देखील सदर महिलेचा शोध घेण्यास प्रारंभ केला होता. रात्री उशीरापर्यंत हा शोध घेतला जात होता. मात्र ती मिळून न आल्याने परत दुसर्‍या दिवशी ग्रामस्थ व पोलिसांतर्फे शोधमोहिम प्रारंभ करण्यात आली.

बगरीचा पाडा येथे आरम नदी पुलाच्या लगत नदीपात्रात सदर महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पो.हवा. भोये, लव्हारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सदर महिलेच्या पार्थिवावर डांगसौंदाणे ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन सुपूर्द केला गेला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com