मजुरांवर बहिष्कार टाकणारा 'तो' वादग्रस्त ठराव अखेर ग्रामपंचायतीकडून रद्द

मजुरांवर बहिष्कार टाकणारा 'तो' वादग्रस्त ठराव अखेर ग्रामपंचायतीकडून रद्द
breaking news

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मालेगाव तालुक्यातील तळवाडे (Talwade Tal Malegaon) येथील ग्रामपंचायतीने (Grampanchayat) परिसरातील गोरगरीब स्त्री-पुरुषांच्या शेतमजुरी बाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि देशाच्या घटनेला आव्हान ठरेल असा अन्यायकारक लेखी ठराव केला होता....

त्यामध्ये मजुरांच्या कामाबाबत एक नियमावली तयार केली होती. सदर नियम मोडल्यास शेतकरी व मजुर यांना आर्थीक दंड करत सामाजिक बहिष्कार टाकण्याची तंबी देण्यात आली होती.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (Superstition eradication comity nashik) व प्रसार माध्यमांच्या भूमिकेमुळे तळवाडे ग्रामपंचायतीने माफीनामा सादर केला. असा बेकायदेशीर ठराव मागे घेत असल्याचे या माफीनाम्यात लिहून दिले आहे.

जुन्या नियमावली नुसार, मजुरांना किती रोजगार द्यावा याच बरोबर इतर गावात मजुरी करण्यात स्थानिक मजुरांना बंदी घालण्यात आली होती. नियम मोडल्यास अकरा हजार रूपये आर्थिक दंड करत किराणा व दळण बंद करून सामाजिक बहिष्कार टाकण्याची तंबी देण्यात आली आहे.

असे घटनाबाह्य नियम करणाऱ्या तळवाडे ग्रामपंचायतीवर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना केली होती.

जिल्हाधिकारी (Collector suraj mandhare nashik) यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन संबंधितांना चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे तळवाडे ग्रामपंचायतमध्ये घबराट निर्माण झाली. भल्या सकाळी ग्रामविकास आधिकारी, तंटा मुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच व इतरांनी माफीनामा सादर केला.

हा प्रकार गैरसमजातून झाला असुन माफी मागत असल्याचे लिहून दिले. कुणावर सामाजिक बहिष्कार टाकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही मजुरावर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या मोहिमेत डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, अॅड. समीर शिंदे प्रल्हाद मिस्त्री, महेंद्र दातरंगे, विजय खंडेराव यांनी सहभाग नोंदवला.

तळवाडे ग्रामपंचायतीने केलेली नियमावलीमुळे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा कायद्याचे उल्लंघन होत होते. ही बाब आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रशासनासचे लक्ष वेधल्याने ग्रामपंचायतीने माफीनामा सादर केला आहे. त्यामुळे अन्य ग्रामपंचायती असे असा ठराव करणार नाही.

कृष्णा चांदगुडे, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com