...अखेर 'तो' मृतदेह 22 दिवसांनी सापडला

...अखेर 'तो' मृतदेह 22 दिवसांनी सापडला
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील पिंपळगाव खांबजवळ असलेल्या दाढेगाव (Dadhegaon) येथील 45 वर्षीय व्यक्ती वालदेवी नदीच्या (Valdevi river) पुरात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह (Dead Body) तब्बल 22 दिवसांनी धाडेगाव येथील वालदेवी नदीच्या शिवारात पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे...

वसंत लक्ष्मण गांगुर्डे (Vasant Gangurde) (रा. दाढेगाव) असे या व्यक्तीचे नाव आहे. दि. १२ सप्टेंबरला वालदेवी नदीच्या पुरात ही व्यक्ती वाहून गेली होती. त्यानंतर मृतदेहाचा शोध घेण्यात आला.

मृतदेह शोधण्यासाठी जिल्हा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे विशाल चौधरी (Vishal Chaudhary) व राहुल बोराडे (Rahul Borade) यांनी परिश्रम घेतले. परंतु, मृतदेह आढळल नाही.

दरम्यान गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरले आहे. परिणामी वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यासाठी जिल्हा आपत्कालीन शोध बचाव पथकाचे विशाल चौधरी, राहुल बोराडे तसेच जॉन भालेकर, मंगेश केदारे, पंडित भगवान, रोशन सोनवणे, प्रवीण काळे, मनोज कनोजिया, संकेत नेवकर, पराग कुलकर्णी आदींनी मृतदेहाचा पुन्हा शोध सुरू केला.

गांगुर्डे यांचा मृतदेह दाढेगाव शिवारातील नदीपात्रात तरंगताना आढळून आला. नगरसेवक जगदीश पवार, तलाठी सुनील बोराडे, नामदेव बोराडे, उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, हवालदार शेख आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास उपनगर पोलीस (Upanagar Police) करत आहे.

Related Stories

No stories found.