अखेर १५ वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूतळा बसवला

अखेर १५ वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूतळा बसवला

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

गेल्या सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम प्रलंबित होते मात्र नगरसेवक राकेश दोंदे (Rakesh Donde) यांच्या प्रयत्नांनी पाथर्डी फाटा येथे डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला....

नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा चबूताऱ्यासह जमिनीपासून सुमारे तीस फूट अंतरावर अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. या पुतळ्याच्या अगदी समोरील बाजूस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता.

त्यासाठी लागणाऱ्या शासनाच्या विविध विभागांच्या परवानगी मिळवण्याचे काम बाकी असल्याने सदर पुतळा अद्याप पर्यंत बसविण्यात आला नव्हता.

मात्र प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक राकेश दोंदे यांनी सदर पुतळा बसवण्यासाठी कलासंचनालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आदी विविध ठिकाणच्या परवानगी मिळवण्याकरता पाठपुरावा केला.

त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा तयार करून हा पुतळा चबूताऱ्यावर बसविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा शिल्पकार विजय बुराडे (Vijay Burade) यांनी दिल्लीतील संसदेतील पुतळ्याप्रमाणे बनविला असून कांस्य धातुपासून तो बनविण्यात आला आहे. याकरिता सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला.

यावेळी भगवान दोंदे, मनपा बांधकाम विभागाचे अभियंता इजाज काजी, बच्छाव, राहुल दोंदे, राहुल राऊत, अंकित दोंदे, सुनील पिंपळसकर, संदीप दोंदे, अरुण जाधव, पप्पू दोंदे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com