अखेर टोईंग व्हॅन नाशिकच्या रस्त्यावर

या मुख्य ठिकाणी होणार कारवाई, असा असेल टोईंग दर
अखेर टोईंग व्हॅन नाशिकच्या रस्त्यावर

नाशिक । Nashik

शहरातील (Nashik City) रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क होणार्‍या वाहनांवरील (Park indiscriminately) कारवाईसाठी अखेर वाहतुक पोलीस विभागाच्या (Traffic Police Department) वतीने टोईंग व्हॅन (Toing Van) नाशिकच्या रस्त्यावर उतरल्या आहेत. आता या बेशिस्त वाहन पार्किंगला चाप लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आज सायंकाळी पोलिस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांच्या याचा प्रारंभ झाला. तसेच टोईंग व्हॅनचे प्रत्याक्षिक (Towing van demonstration) यावेळी सादर करण्यात आले.

तर बुधवारपासून चार टेम्पोंसह तीन क्रेन प्रत्यक्ष कारवाई (Direct action) सुरू करणार आहेत. शरणपूररोडवरील (Sharanpur Road) वाहतूक शाखेच्या (Traffic Police) युनिट दोनच्या कार्यालयात वाहने जमा करण्यात येणार आहे.

रस्त्यावर वाहने पार्क करणार्‍या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पुन्हा ‘टोइंग’ व्हॅन सुरू करण्यात आल्या आहेत.

मागील सहा महिन्यांपासून याची प्रक्रिया सुरू होती. अखेर यास आज मुहुर्त लागला आहे. शहरात दुचाकीस्वारांची संख्या मोठी असून, दुचाकीस्वारांनाच टोईंगचा मोठा आर्थिक भुर्दंड (Financial ruin) बसण्याची शक्यता आहे.

शहरातील बेशिस्त वाहतूकीस आळा घालण्याबरोबरच कुठेही वाहणे पार्क करणार्‍या वाहनधारकांसाठी पुन्हा एकदा टोईंगचाच पर्याय पुढे आला आहे. ठेकेदारांकरवी केली जाणारी ही कारवाई टोईंग व्हॅन ठेकेदाराच्या कामगारांच्या अरेरावीमुळे बंद करण्यात आली होती.

मात्र शहरातील स्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा टोईंग व्हॅनचा पर्याय पोलिसांनी निवडला. हायड्रोलीक सिस्टिम (Hydraulic system) असलेल्या या वाहनांवर 15 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. गत वेळेचे अनुभव लक्षात घेता यावेळी टोईंग व्हॅन उचलण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहे. यातून नागरिक व कर्मचाार्‍यांमध्ये वाद होणार नाहीत.

ही आधुनिक यंत्रणा आहे. ही यंत्रणा प्रोयोगीक असून सीबीएस (CBS) व शालिमार (Shalimar) भागातील दहा ठिकाणे, महामार्ग बस स्थानकसमोरील (Highway bus station) रस्ता, सीटी सेंटर मॉल परिसर(City Center Mall), रविवार कारंजा (RK) आणि पंचवटीतील (Panchavti) पाच नो पार्किंग असलेल्या ठिकाणी ही कारवाई होणार आहे.

तीन महिन्यानंतर शहरातील उर्वरीत ठिकाणांचा विचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील रस्त्यावर वाहने पार्क होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले आहे.

असे टोईंग दर

दुचाकी वाहनांसाठी टोइंग कारवाई 90 व शासकीय तडजोड शुल्क 200 असे एकूण 290 रुपये दंड असेल. तर तीनचाकी वाहनांसाठी टोईंगचा दर 1 रुपया व शासकीय तडजोड शुल्क 200 रुपये असा एकूण 201 रुपयांचा दंड राहणार आहे. तर चारचाकी वाहनांसाठी टोइंग दर 350 व शासकीय तडजोड शुल्क 200 असा एकूण 550 रुपयांचा दंड राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com