अवकाळीच्या नुकसानीचा अंतिम अहवाल सादर

1223 शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका
अवकाळीच्या नुकसानीचा अंतिम अहवाल सादर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मार्च महिन्यात ( March Month ) 7 ते 11 मार्चदरम्यान जिल्ह्याला अवकाळीने( Untimely Rain ) तडाखा दिला. या पावसाने 290 गावे बाधित झाले असून 1223 शेतकर्‍यांना या अवकाळीचा फटका बसला. 636 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना दणका बसला ( Crop Damages ) आहे. कृषी विभागाने अंतिम नुकसानीचा अंतिम अहवाल ( Final Repoprt ) जिल्हा प्रशासनाला पाठविला असून त्यात, 99 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

पावसाने निफाड, सटाणा, मालेगाव तालुक्याला तडाखा दिला. त्याचप्रमाणे 11 मार्च रोजी झालेल्या पावसाने दिंडोरी, नाशिक, सिन्नर, सुरगाणा, पेठ तालुक्यात मोठे नुकसान केले. काढणीला आलेले द्राक्ष, गहू, हरभरा, भाजीपाला पिके मातीमोल झाले. अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

फळपीक सोडून बागायती पिकाखालील 46.14 हेक्टरला अवकाळी पावसाचा दणका बसला आहे. त्यात, 7 तालुक्यात 241. 63 हेक्टर कांदा, 64.80 हेक्टर गहु, 1.75 हेक्टर मका, 0.20 हरभरा, 2.04 हेक्टर उस, 0.67 हेक्टर ज्वारी चारा पीक, 30.13 हेक्टरवरील भाजीपाला तर 0.57 हेक्टरवरील पपई याप्रमाणे 341.79 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले फळपीक सोडून बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर 13500 रुपयाप्रमाणे निधीची मागणी शासनाकडे नोंदविली जाणार आहे.

295 हेक्टरवर द्राक्षाला फटका

बहुवार्षीक फळ पिकाखालील सर्वाधीक 294.51 हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. फळपिकांच्या नुकसानीपोटी 18 हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे मदत दिली जाते. फळपीकांचे जिल्ह्यात 53 हेक्टरहून आधिक पिकांचे नुकसान झाले आहेत. त्यात, पेरु 0.25 हेक्टर, आंबा 3.10 हेक्टर, द्राक्ष 294.51, डाळींब 4.60 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. साधारण 53 लाखांच्या मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविणार आहे.

Related Stories

No stories found.