गट-गणांचा अंतिम प्रारूप आराखडा प्रसिद्ध

इच्छुकांच्या नजरा आरक्षणाकडे
गट-गणांचा अंतिम प्रारूप आराखडा प्रसिद्ध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद ( Zilla Parishad )गट आणि गणांचा ( Gat & Gan )अंतिम प्रारूप आराखडा किरकोळ बदल करत अंतिम झाला आहे. शासकीय राजपत्रात हा आराखडा प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये काही तालुक्यांतील 7 ते 8 गटामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये गटाला जोडण्यात आलेल्या नव्या गावांवर आक्षेप आल्यामुळे या गावांना वगळण्यात आले आहेत.

गट निश्चित झाल्यानंतर आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांसह इच्छुकांच्या नजरा आता आरक्षणाकडे लागल्या असून याबाबत उत्सुकता लागली आहे. गट, गणांचा अंतिम प्रारूप आराखडा नकाशा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या फलकावर लावण्यात आला आहे.

प्रारूप गट, गण रचनेवर विक्रमी 93 हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे 13 जून रोजी सुनावणी झाली. या प्रक्रीयेत तक्रारदारांनी उपस्थित राहून आक्षेप नोंदविले होते. आयुक्त गमे यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांचीही बाजू ऐकून घेत, 22 जून रोजी अंतिम निर्णय दिला. या निर्णयानुसार काही गट, गणात फेरबदल करत आराखडा अंतिम करत प्रसिध्द करण्यात आला आहे.

असा झाला गावांचा बदल

यामध्ये सुरगाणा तालुक्यातील भदर गटात असलेले मोहपाडा गाव आता बोरगाव गटात समाविष्ट करण्यात आले आहे. निफाड तालुक्यात लासलगाव व विंचूर गटातील गावांची अदलाबदल झाली आहे. निमगाव वाकडा व ब्राम्हणगाव ही दोन गावे लासलगाव ऐवजी विंचूर गटाला जोडण्यात आली आहे. तर, पिंपळगाव नजीक हे गाव विंचूर ऐवजी लासलगाव गटात समाविष्ठ करण्यात आले आहे.

नाशिक तालुक्यातील पिप्री सय्यद गटातील कोटमगाव हे गाव पशले गटात समाविष्ठ करण्यात आले आहे. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गटात यापूर्वी दहावी हे गाव होते. त्या ऐवजी आता अंबानेर हे नवीन गाव जोडण्यात आले आहे. तसेच कसबेवणी गटात दहावी व मावडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. मावडी हे गाव यापूर्वी खेडगाव या गटात होते.

नवीन आराखडयाानुसार हे गाव खेडगाव गटात राहणार नाही. सिन्नर, बागलाण, नांदगाव, येवला, चांदवड, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गटात किरकोळ स्वरूपाचे बदल करण्यात आले असून हा बदलानंतर सुधारीत आराखडा अंतिम करण्यात आला. अंतिम झालेला आराखडा प्रसिध्द झाला आहे. अंतिम आराखडा प्रसिध्द झाल्याने गट, गण यांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुकांकडून हालचालींना सुरूवात झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com