त्र्यंबकेश्वर : वाहनतळाची झाली 'अशी' अवस्था

त्र्यंबकेश्वर : वाहनतळाची झाली 'अशी' अवस्था

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

येथील वाहनतळावर (Parking) मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता (unsanitary) असल्याने बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंनी (Pilgrims) नाराजी व्यक्त केली आहे...

त्र्यंबक नगरपरिषद (Trimbak Municipal Council) वाहनतळासाठी कर आकारते. येथील वाहनतळावर कुंभार तलाव (Potter Lake) नावाचा जुना तलाव आहे. या तलावात नेहमी अस्वच्छता असते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरते.

तसेच साडेतीन कोटी रुपये खर्च करून हे वाहनतळ कुंभमेळा निधीतून (Kumbh Mela Fund) विकसित करण्यात आले असून त्यानंतर वेळोवेळी इतरही खर्च करण्यात आला आहे.

तर त्र्यंबक नगरपरिषदेने या वाहनतळासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला असून उत्पन्नही भरपूर मिळविले आहे. परंतु स्वच्छता नसल्याने भाविकांमध्ये चुकीचा संदेश जात असून तलावात वनस्पती (plant) वाढल्यामुळे येथे तलाव असल्याचे लवकर समजू येत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com