येत्या आठ दिवसांत खड्डे बुजवा अन्यथा..

येत्या आठ दिवसांत खड्डे बुजवा अन्यथा..

सातपूर | Satpur

नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal corporation) प्रभाग क्रमांक ८ मधील वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर पावसामुळे कमी प्रमाणात खड्डे (potholes) पडल्याने प्रभागातील नागरिकांनी याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत रस्त्यातील खड्डे बुजविण्यासंदर्भात संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत प्रभागात दौरा करून ज्या ठिकाणी खड्डे पडलेत त्यांची त्वरित आठ दिवसांत दुरुस्ती करण्याच्या सूचना शिवसेने चे नगरसेवक तथा गटनेता विलास शिंदे (Corporater Vilas Shinde) यांनी दिल्या.

शंकर नगर, सावरकर नगर, पाईपलाईन रोड, बळवंत नगर, पाटाचा रस्ता आदी भागातील रस्ते खराब झाले होते. अनेक ठिकाणी खड्डयांनी रस्त्याची दुरावस्था झाली होती. यामुळे प्रभागातील नागरिकांच्या तक्रारींवर दखल घेत रस्त्यातील खड्डे बुजविण्यासंदर्भात संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी (Public Work Department) यांच्यासोबत प्रभागात दौरा करण्यात आला.

यावेळी ज्या ठिकाणी खड्डे पडलेत त्यांची दुरुस्ती त्वरित आठ दिवसांत करण्याच्या सूचना शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेता विलास शिंदे यांनी दिल्या. आठ दिवसात दुरुस्ती न केल्यास शिवसेना (Shivsena) स्टाईल ने काम करून घेतले जाईल असा इशारा यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी सातपूर विभागाचे बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र पाटील, शाखा अभियंता गावित, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत बेंडकुळे, वसंत खताळे, रोशन उन्हाळे, अंकुश खताळे, सुनील जाधव, मयूर पाटील, तन्वीर मणियार, राहुल उन्हाळे,कुणाल खताळे, नितीन गांगुर्डे आदी उपस्थित होते.

सातत्याने सूचना देऊनही विकासकामांना गती दिली जात नाही. नागरिकांच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने यामुळे अधिकाऱ्यांचा मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही.

- विलास शिंदे, नगरसेवक प्रभाग ८

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com