रस्त्यांवरील खड्डे बुजवा; मनपा आयुक्तांचे आदेश

रस्त्यांवरील खड्डे बुजवा; मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा जोरदार पुनरागमन करणार्‍या पावसामुळे (rain) शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे (potholes) साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान नाशिककरांना त्रास होऊ नये तसेच शहरातील रस्त्यांवरील खड्डे (potholes) लवकरात लवकर बुजविण्यात यावे, यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) आज शासकीय सुट्टी असताना देखील ठिकठिकाणी फिरून कामाचा आढावा (Review of work) घेताना दिसले. खड्डे बुजवताना कामाच्या गुणवत्तेकडे देखील लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

आज (दि.16) महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) ठिकठिकाणी कामांचा आढावा घेतला तर खड्डे बुजवताना गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे आदेश दिले. त्यांनी सायकल ट्रॅकचीही पाहणी करुन अतिक्रमीत वाहने हटवण्याचे आदेश दिले. नाशिकरोड विभागात (Nashik Road Division) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याजवळील चौकात रस्त्याची पाहणी करुन त्वरीत खड्डे बुजववावेत आणि त्यासाठी जीएसबी मटेरीअलचा वापर करून पाऊस थांबल्यावर त्वरीत डांबर मटेरीअलचा वापर करण्याची सूचना आयुक्तांनी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयाजवळच्या रस्त्याचीही पाहणी केली. येथील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश देत या मार्गावर नवीन रस्त्यासाठी टेंडरची प्रक्रिया सुरु करण्याची सूचना केली. जेलरोड भागातही पाहणी केली. बिटको चौक ते गौदावरी नदी (godavari river) नांदूर चौक येथील रस्त्याची पाहणी करुन रस्त्यालगतचा गाळ हटवण्याची सूचना केली. पंचवटी (panchavati) आणि नाशिक पश्चिम विभागातही आयुक्तांनी पाहणी केली.

मनपा आयुक्तांनी त्र्यंबक नाका ते स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव (Veer Savarkar Swimming Pool) दरम्यानच्या सायकल ट्रॅकची पाहणी करुन येथील अतिक्रमित वाहने हटवण्याचे आदेश दिले. सायकल ट्रॅकवर इतर वाहनांचे अतिक्रमण होणार नाही, ट्रॅकचा योग्य वापर होईल, याकडे लक्ष द्या, असे आयुक्तांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे (Additional Commissioner Suresh Khade), शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड आदी अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com