Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची 'दादागिरी'; कॉलर पकडून कावडधारक शिवभक्तांना धक्काबुक्की

Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची 'दादागिरी'; कॉलर पकडून कावडधारक शिवभक्तांना धक्काबुक्की

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून हजारो भाविक (Devotee) याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र, अनेकदा भाविकांना दर्शन घेतांना मंदिरातील सुरक्षारक्षकांच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळत असते. अशातच आता पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षारक्षकांनी वाशिम (Washim) येथून कावड घेऊन आलेल्या शिवभक्तांना कॉलर पकडत धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची 'दादागिरी'; कॉलर पकडून कावडधारक शिवभक्तांना धक्काबुक्की
Video : पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास

याबाबत अधिक माहिती अशी की, काल शुक्रवार (दि.२५) काही शिवभक्त वाशिम येथून कावड घेऊन त्र्यंबकेश्वर येथे आले होते. हे शिवभक्त दर्शनासाठी रांगेत उभे असतांना येथील काही सुरक्षारक्षकांनी (Security Guards) या शिवभक्तांना दर्शनासाठी मज्जाव केला. यावेळी त्या शिवभक्तांनी सुरक्षारक्षकांना दर्शनासाठी का नाही जायचे असा प्रश्न केला असता सुरक्षारक्षकांनी कावड शिवभक्तांना धक्काबुक्की व कॉलर पकडून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप या शिवभक्तांनी केला आहे.

Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची 'दादागिरी'; कॉलर पकडून कावडधारक शिवभक्तांना धक्काबुक्की
Video : सिडको परिसरात टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड

दरम्यान, याप्रकरणी कावडधारक शिवभक्तांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) सुरक्षारक्षकांविरोधात तक्रार (FIR) दाखल करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आता त्र्यंबकेश्वर पोलीस व मंदिर प्रशासन कावड धारक शिवभक्तांना धक्काबुकी व शिवीगाळ करणाऱ्या सुरक्षारक्षकांविरोधात काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची 'दादागिरी'; कॉलर पकडून कावडधारक शिवभक्तांना धक्काबुक्की
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार - भुजबळ
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com