विनापरवाना देशी मद्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विनापरवाना देशी मद्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक | Nashik

तेलंगवाडी (Telangwadi) येथे विना परवाना देशी दारूची विक्री (Sale of unlicensed country liquor) केल्याप्रकरणी एकावर पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavti Police Thane) गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल हनुमंत जाधव (Anil Hanumant Jadhav) 40, रा. तेलंगवाडी, पेठरोड, पंचवटी, नाशिक ) हा ( दि. 17 ) पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात प्रिन्स संत्रा (Prince santra) नावाची देशी दारू विकत असल्याचे पोलिसांना खबऱ्यां मार्फत कळाले.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्याच्या राहत्या घरातून प्रिन्स संत्रा देशी दारूचे 10 बॉक्स त्यात 196 काचेच्या सीलबंद बाटल्या असा २३ हजार ४00 रुपयांचा ऐवज जमा करून जाधव यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक ठाकरे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com