विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तरुणीकडे बघत आक्षेपार्ह बोलत चार जणांनी मायलेकीस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला...

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सुरज प्रमोद पाटील (Suraj Patil) (२४, रा. पाईपलाइन रोड, गंगापूर रोड) व प्रशांत गवळेसह (Prashant Gawale) इतर दोघांविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुरज पाटील याने शनिवारी (दि.१३) रात्री १०.२५ च्या सुमारास विनयभंग करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यास पीडितेने जाब विचारला, तसेच तिची बहिण व आई बाहेर आल्या.

त्यावेळी सुरजने प्रशांतसह इतर दोघांना बोलवून घेत पीडिता व तिच्या आईला शिवीगाळ करीत धमकावले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक पगार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com