विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह तीघांवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह तीघांवर गुन्हा दाखल

नाशिक l Nashik :

माहेरून तीन लाख रूपये आणावेत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी छळ केल्या प्रकरणी पतीसह तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज नितीन गोसावी, भावना गोसावी, नितील गोसावी (रा. सर्व अकलोली, भिवंडी, जि. ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी सातपूर कॉलनी येथे राहणार्‍या पिडीत विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार माहेरून पैसे आणावेत या कारणासाठी तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी शाररीक तसेच मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक आहेर करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com