हुंडयात केली अजब मागणी; नाशिकच्या नवरदेवाचा औरंगाबादमध्ये प्रताप

संग्रहित
संग्रहित

औरंगाबाद - Aurangabad

साखरपुडा करताना हुंड्यापोटी सव्वादोन लाखांची बोलणी झाली. साखरपुडाही उरकला. मात्र अचानक भावी नवरदेवसाच्या परिरातील सदस्यांनी अजब मागणी वधुपक्षासमोर ठेवली. मुलीला नोकरीसाठी दहा लाख रुपये द्यावे. दहा लाखांसोबत 21 नखी कासव तसेच लॅब्रॉडार कुत्र्यासह अन्य वस्तूंची अजब मागणी ठेवली. ती पूर्ण न केल्याने लग्नही मोडले. या प्रकरणी वधुपक्षाने थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन, हुड्यांच्या दहा लाखांसह अजब मागणी ठेवणाऱ्या भावी नवरदेवासह त्याच्या परिवारातील अन्य सदस्यांच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात (Usmanpura Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

वीटभट्टी व्यावसायिक अनिल मगनराव सदाशिवे यांच्या तक्रारीनुसार, सदाशिवे कुटुंबीयांच्या मुलीला नाशिक येथील चराटे कुटुंबाने पसंत केले.

या दोन्ही पक्षामध्ये हुंड्याबाबत सव्वादोन लाख रुपये तसेच सोन्याची अंगठी देण्याचे निश्चित करण्यात आले. सदाशिवे यांनी साखरपुडा करताना ती मागणी पूर्णही केली.

मात्र, त्यानंतर वर पक्षाकडील काही जणांनी आणखी मागणीची यादीच सदाशिवे यांच्यासमोर ठेवली. यात जिवंत कासव, तसेच लब्रॉडॉर कुत्रा, मूर्ती आणि समईसारख्या वस्तूंची मागणी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com