ब्रम्हगिरी खोदकाम प्रकरण : फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा निलंबन

ब्रम्हगिरी खोदकाम प्रकरण : फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा निलंबन

नाशिक | Nashik

ब्रह्मगिरी (Bramhagiri), संतोषा व भांगडा डोंगराच्या अवैध उत्खनन प्रकरणी कारवाईस विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे ( Sanjay Bansode) यांनी कानउघाडणी केली.

तसेच आठ दिवसांत या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा निलंबनाच्या (Suspend) कारवाईला सामोरे जा असा सज्जड दमही ना. बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

मुंबई (Mumbai) येथे मंत्रालयात ब्रह्मगिरीसंदर्भात मंगळवारी ना.बनसोडे यांनी बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

ब्रह्मगिरी, संतोषा व भांगडा डोंगर परिसरात अवैधपणे उत्खननाच्या घटनेला दोन महिने उलटूनदेखील स्थानिक यंत्रणांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच संबंधित प्रकरणात तातडीने लक्ष घालत दोषींवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, पर्यावरण राज्य मंत्र्यांनीच या प्रकरणी यंत्रणांवर कोरडे ओढत तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत .

त्यामुळे ब्रह्मगिरीचे लचके तोडणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. बैठकीला महसूलसह वन , प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह ब्रह्मगिरी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .

पर्यावरणवाद्यांची कारवाईची मागणी ब्रह्मगिरीसह संतोषा आणि भांगडा डोंगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध उत्खनन सुरू आहे.

विशेष म्हणजे या उत्खननाबाबत महसूल , वनविभाग तसेच यंत्रणा अनभिज्ञ होत्या. मात्र , पर्यावरणवाद्यांनी हा सर्व प्रकार उघड केल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यात लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर झोपेतून जागे झाल्याचे सोंग घेणाऱ्या महसूल विभागाने अवैध उत्खनन करणाऱ्यांकडून दंड वसूल करतानाच काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे सोपस्कार पूर्ण केले. परंतु, पर्यावरणवाद्यांनी ठोस कारवाईची मागणी केली होती .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com