
सिन्नर । वार्ताहर Sinnar
तालुक्यातील पांगरी (pangri) येथील पेयजल योजनेत (Drinking water scheme) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर तत्काळ फोैजदारी गुन्हे दाखल करा. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी आत्मदहन (Self-immolation) करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी (bhausaheb bairagi) यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन (memorandam) देत दिला आहे.
पांगरी येथील घरकुल योजनेत व पेयजल योजनेत गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. गैरकारभार करणार्या अधिकारी, पदाधिकारी व लाभार्थी यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करून फौजदारी गुन्हे (Criminal offenses) दाखल करण्याचे आदेश असूनही फक्त अपहाराची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
पंचायत समितीचे अधिकारी कागदपत्रे गहाळ (Missing documents) झाल्याचे सांगत असल्याचा आरोप बैरागी यांनी केला आहे. सहाय्यक लेखा अधिकार्यांना (Assistant Accounting Officers) गट विकास अधिकार्यांनी 4 वर्षांपुर्वी गैरकारभार झालेल्या प्रकरणाचीच कागदपत्र उपलब्ध करण्याचे अनेक वेळा आदेश देऊनही आजपर्यंत कागदपत्र उपलब्ध झाले नसून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवदेनात केली आहे. गावातील रोजगार हमी विहिर योजनेतही गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतरही अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
पेयजल योजनेच्या विहिरीचे काम अपूर्ण असताना उंच भराव करण्यात आला आहे. विहीरीवर स्टेज गॅलरी न बांधताच 3 लाख 84 हजार रुपये संबंधितांनी काढून घेतले आहेत. आजपर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त खर्च करुनही पेयजल योजनेतील पाईपलाईनची गळती थांबलेली नाही. मनेगावसह 16 गावे पाणी पुरवठा योजनेमध्ये पांगरीचा समावेश असताना गावाला पाणी मिळत नसल्याची खोटी तक्रार करत 1 कोटी 35 लाखांची नवी पाणी योजना फक्त अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदाराने खिसे भरण्यासाठी राबवली असल्याचा आरोप बैरागी यांनी केला आहे. सोमवार (दि.13) पर्यंत संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा बैरागी यांनी निवदेनात दिला आहे.
अन्यथा माझ्यावर कारवाई करा
अनेकवेळा योजनेतील दोषींवर कारवाई करण्यासाठी बैरागी यांनी उपोषण, आंदोलने केले आहे. मात्र, तरीही संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत. मी चुकीचे आरोप करीत असेल तर शासकीय अधिकार्यांना वेठीस धरल्याच्या ठपका ठेवत माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी बैरागी यांनी निवेदनात केली आहे.