मिटकरींवर गुन्हा दाखल करा: भाजप

मिटकरींवर गुन्हा दाखल करा: भाजप

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party), ब्राह्मण महासंघ (Brahmin Federation), अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, तालुका पुरोहित संघ यांनी संयुक्तरित्या तंहसिलदार राहुल कोताडे (Tahasildar Rahul Kotade) व पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे (Police Inspector Santosh Mutkule) यांना निवेदन (memorandum) देत आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली.

मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल व हिंदू धर्मातील संस्काराबद्दल केलेल्या बेताल व्यक्तव्याचा यावेळी पदाधिकार्‍यांनी निषेध व्यक्त केला. मिटकरी यांनी 19 एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमात ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मातील (hindu dharma) धार्मिक संस्काराबद्दल अत्यंत प्रक्षोभक आणि जातीयवादी तेढ निर्माण करणारी विधाने केली.

मिटकरींनी या अगोदरही भारतीयांच्या भावना दुखावण्याचे आणि विविध धर्माच्या, जातींच्या बाबतीत चुकीची वक्तव्ये करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. मिटकरी यांच्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा यासाठी तहसिलदार व पोलिस निरिक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे,

अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद प्रदेशाध्यक्ष डॉ.दिपककुमार श्रीमाळी, ब्राह्मण महासंघाचे तालुकाध्यक्ष मनोज खेडलेकर, उपाध्यक्ष भूषण रत्नाकर, भास्कर कुलकर्णी, दिलीप बीडवई, किशोर देशमुख, पांडूरंग पाटोळे, विनय पांडे, हितेश वर्मा, हर्षल मुळे, सतिश मुळे, सागर जाखडी, गौरव कुलकर्णी, मंगेश मुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.