
सिन्नर । वार्ताहर Sinnar
शहरातील युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी Suspicious death संशयित रईस शेखवर 302 चा गुन्हा दाखल करा. यासाठी पुरावे मिळवावेत, पिडीतेच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ Bharatiya Janata Party Women's Front State President Chitra Wagh यांनी सिन्नर पोलिसांना Sinnar Police केली.
मृत युवतीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर वाघ यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्यासोबत चर्चा केली.
पिडीतेच्या नातलगांनी रईसच्या अन्य दोन मित्रांची चौकशी करावी, त्याच्या सहकारी पोलिसांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावे, अशी मागणी केली. उपअधीक्षक तांबे यांनी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून रईसचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करता पाठविण्यात आल्याचे सांगितले. पिडीत किरणशी संबंधित वैद्यकीय पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तपासात जसजसे पुरावे समोर येतील, तसतसे रईसवर कलमे वाढविण्याची ग्वाही तांबे यांनी दिली.
या प्रकरणातील जाबजबाब न्यायाधीशांसमोर इनकॅमेरा होणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. तपासाची स्थिती पिडीतेच्या नातलगांना समजण्यासाठी अधिकारी व पीडितेचे नातलग यांच्यात समन्वय असू द्यावा, पीडितेच्या नातलगांकडे असलेली माहिती लेखी स्वरूपात पोलिसांना सादर करावी अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.
निरीक्षक संतोष मुटकुळे, भाजपचे सुनील बच्छाव, गिरीष महाजन, भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, बाळासाहेब हांडे, नारायण वाजे, शरद कासार, विशाल क्षत्रिय, सचिन गोळेसर उपस्थित होते.