गाडी पार्किंगवरून दोन गटात हाणामारी
नाशिक

गाडी पार्किंगवरून दोन गटात हाणामारी

देवळाली गावातील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक। Nashik

गाडी पार्क करण्याच्या कारणावरून पाच जणांनी एका इमारतीत घुसून कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२८) सकाळी देवळाली गाव येथे घडला.

मंगेश गिते, राहुल औशिकर, पप्पु पाळदे, शंकर, पप्पु चव्हाण (रा. सर्व सोमवार पेठ, देवळाली गाव) अशी मारहाण करणार्‍या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी अदित्य सिद्धेश्वर दंदणे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री चारचाकी गाडी पार्किंमध्ये पार्क करण्याच्या वादाच्या रागातून मंगळवारी सकाळी दंदणे यांच्या घरात घुसून त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com