नाशिक रोड | प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे या गावी दोन गटात हाणामारी होऊन या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहे.

या जखमींना उपचारासाठी महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे यासंदर्भात नवनाथ अंबादास गायधने यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

त्यात म्हटले आहे की, मी ग्रामपंचायत कार्यालय जवळ गेलो असता त्या ठिकाणी नामदेव आगळे रावसाहेब गायधनी साहेबराव गायधनी हे आले व त्यांनी गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद उरकून काढून मला लाथाबुक्क्यांनी चॉपरने मारहाण केली

मदतीसाठी धावून आलेल्या धनंजय गायधनी दिनकर गायधनी यांनासुद्धा दगड व विटा ने मारहाण केली तर दुसरी तक्रार ज्ञानेश्वर गायधनी यांनी केली त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भगवंत गायधनी व त्यांच्या दोन मुलांनी मला मारहाण केली सदर घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.