शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथी, प्रवाशांमध्ये हाणामारी

शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथी, प्रवाशांमध्ये हाणामारी

नाशिकरोड | Nashik

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Pune) असलेल्या शिंदे टोल नाक्यावर (Shinde Toll Point) तृतीयपंथी व प्रवाशांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली. सदरचा प्रकार हा पैसे मागण्या वरून झाला.

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गाव येथे टोल नाक्यावर गेल्या काही दिवसापासून तृतीयपंथी (Transgender) हे टोल नाक्यावर उभे राहून वाहनाद्वारे येणाऱ्या प्रवाशांकडे पैसे मागत असतात प्रवासी जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत गाडी सोडत नाही.

परिणामी सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास टोल नाक्यावर सिन्नर(Sinnar) वरून नाशिककडे आपल्या चारचाकी वाहनांमध्ये प्रवासी चालले होते. या प्रवाशांकडे तृतीयपंथीयांनी पैसे मागितले सदर प्रवाशांनी पैसे दिले. परंतु काही वेळानंतर हे प्रवासी पुन्हा नाशिकरोड (Nashikroad) वरून सिन्नर कडे चालले होते.

टोल नाक्यावर पुन्हा तृतीयपंथीयांनी या प्रवाशाकडे पैसे मागितले. त्यामुळे सदरचे प्रवासी म्हणाले की आम्ही अगोदर पैसे दिले आहे. मात्र आम्हाला पैसे द्यावेच लागेल अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली. त्यामुळे तृतीयपंथी व प्रवासात वाद झाला. त्यानंतर बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले तब्बल दहा ते पंधरा मिनिटं हाणामारी सुरू होती. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या संदर्भात टोलनाक्याचे व्यवस्थापक नानक तुलला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की तृतीयपंथीयांच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही पोलिसांना यापूर्वीच कळविले आहे. परंतु त्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे सदरचे तृतीयपंथी हे रोज येतात व पैसे मागतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com