नाशिक | Nashik

गंजमाळ येथील श्रमिक नगर परिसरात दोन गटात हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने भद्रकाली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे.

योगेश धुराजी हिवाळे (२४, रा. भीमवाडी, गंजमाळ) याच्या फिर्यादीनुसार संशयित जावेद पठाण, गफार हसन शहा उर्फ पाप्या, सोनु शेख, सरजीन शेख, शाहरुख शेख, इम्रान,दीपक पाटील यांनी कुरापत काढून योगेशला लोखंडी रॉडने मारहाण करुन दात पाडून गंभीर दुखापत केली.

तर गफार शहा याच्या फिर्यादीनुसार संशयित योगेश हिवाळे, नितीन हिवाळे, भिन्या, सर्जा, मिनाबाई मोरे व इतर संशयितांनी कुरापत काढून दीपक पाटील यास लोखंडी रॉडने मारहाण करुन दुखापत केली. तसेच गफार शहा व जावेदला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत.