पडघम ‘ जि.प.’ चे: खेडगाव गटात पक्ष नेतृत्वांमध्ये चुरस

पडघम ‘ जि.प.’ चे: खेडगाव गटात पक्ष नेतृत्वांमध्ये चुरस

दिंडोरी | संदीप गुंजाळ | Dindori

तालुक्याचे राजकीय माहेरघर म्हणून खेडगावचा (khedgaon) उल्लेख होतो. खेडगाव गटातून तालुक्याचे राजकारण चालते. मागील जिल्हा परिषद (zilha parishad) निवडणूकीत वाढलेली चुरस व पणाला लागलेली प्रतिष्ठा याची साक्ष देवून गेली. यंदाही गटात कोणते आरक्षण (Reservation) जाहीर होईल, यापेक्षा खेडगाव गटाची सत्ता कुणाकडे राहणार याची जोरदार चर्चा आहे.

खेडगाव गटाची निवडणूक (election) होतांना आजपर्यंत पक्षाच्या प्रमुख नेतृत्वात लढत झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणूकीत माजी आमदार धनराज महाले (MLA Dhanraj Mahale) व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे (NCP taluka president Bhaskar Bhagre) यांच्यात झालेल्या लढतीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

त्यात धनराज महाले यांनी विजय मिळविला असला तरी लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha elections) त्यांची राष्ट्रवादीतील प्रवेश व त्यानंतर झालेल्या घडामोडी या जिल्ह्यात चर्चेच्या ठरल्या. लोकसभेत नशिब अजमावतांना धनराज महाले यांना जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत विजय वाघ व भास्कर भगरे यांच्यात झालेल्या लढतीत भगरे विजयी झाले. जिल्हा परिषद (zilha parishad) निवडणूकीत (election) राष्ट्रवादी आणि शिवसेना (shiv sena) या दोन पक्षात प्रमुख लढत आजपर्यंत दिसली आहे. यात पक्षांच्या नेतृत्वांनी निवडणूकीत उडी घेतल्याने खेडगाव गटातील निवडणूकीत चुरस अधिकाधिक वाढलेली दिसत आहे. खेडगाव गटाची जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेतृत्वांनी गटाचे नेतृत्व केलेले आहे.

पंचायत समितीमध्ये (panchayat samiti) अनेकांनी सभापतीपदी व जिल्हा परिषद अध्यक्षसह इतर महत्त्वाच्या खात्यांवर सभापती म्हणून खेडगावकरांनी नेतृत्व केले आहे. असे असतांना मतदार (voter) मात्र खेडगाव गटाच्या विकासाबाबत आजही समाधानी नाहीत, असेच काहीसे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस जनतेची वाढत असलेल्या अपेक्षा लोकप्रतिनिधी पूर्ण करण्यास खरंच कमी पडतात का? हा एक संशोधनाचा विषय ठरत आहे. आजही सोशल मिडीयावर चर्चा करतांना खेडगाव गटातील प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे या निवडणूकीत पक्षाचे नेतृत्व उमेद्वारी करणार की नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार ही येणारी वेळच सांगू शकते. परंतू सध्या राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (shivsena), काँग्रेस (congress), भाजप (bjp), माकप आदी पक्षाच्या इच्छुक उमेद्वारांनी खेडगाव गटातून नशिब आजमवण्यासाठी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

खेडगाव गटातून यंदाच्या निवडणूकीत वरखेडा, आंबेवणी हे दोन गावे निसटली असली तरी वरखेडा येथील राजेंद्र उफाडे यांनी या गटात उमेदवारी करण्याची तयारी दर्शविली आहे. खेडगाव गटातील आरक्षण सर्वसाधारण, अनुसूचित जमाती, इतर मागासप्रवर्ग या आरक्षणात फिरत असल्याने यंदाच्या निवडणूकीत कोणते आरक्षण निघेल, यासाठी तर्कवितर्क लढविले जात असले तरी यंदाच्या निवडणूकीत प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे नक्की...!

खेडगाव गटातील पं.स. सभापती

अ‍ॅड. बाजीराव कावळे, रामभाऊ डोखळे, पोपटराव ढगे, श्रीराम शेटे, सत्यभामाताई बस्ते, सदाशिव शेळके, छाया डोखळे, भास्कर भगरे, एकनाथ खराटे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com