करोनामुक्त
करोनामुक्त
नाशिक

जिल्ह्यात पावणेचार हजार रूग्णांची करोनावर मात

करोनामुक्त होणारांचे प्रमाण ६०. ६४ टक्के

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. दररोज सरासरी 200 पेक्षा अधिक रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र असे असले तरी करोनावर मात करणारांची संख्याही वाढत असून सरारी 190 रूग्ण दररोज करोनावर मात करत आहेत. आतापर्यंत 3 हजार 886 जणांनी करोनावर मात केली आहे. हे प्रमाण सरासरी 6064 टक्के इतके आहे.

शहर तसेच ग्रामिण भागातील नवनव्या गावात करोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. करोनाग्रस्त, तसेच जोखमीच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. तर आता घरीच कोरोंटाईन होऊन घरीच उपचार घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सध्या नाशिक शहरातील रूग्णांची संख्या 3 हजार 595 झाली आहे. तर जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या 6 हजार 305 झाली आहे.

दुसरीकडे दररोज नव्याने दाखल होणार्‍या रूग्णांची संख्याही वाढत आहे. एकाच दिवसात जिल्ह्यातून सरासरी 600 पेक्षा अधिक नवे संशयित दाखल होत आहेत. तर जिल्ह्यातील बळींची संख्या 306 झाली आहे. परंतु दिवसेंदिवस करोनावर मात करत पुर्ण बरे होणार्‍या रूग्णांची संख्याही वाढत चालली आहे.

1 जुलै पासून सरासाी 190 पेक्षा अधिक रूग्ण दररोज बरे होत आहेत. असे आतापर्यंत 3 हजार 836 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामध्ये 200 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचाही सामावेश आहे. बरे झालेल्यांमध्ये सर्वाधिक नाशिक शहरातील 1 हजार 964 रूग्ण आहेत. ग्रामिण भागातील 863, मालेगाव 913 तर 96 जिल्हा बाह्य आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातून 25 हजार 341 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 19 हजार 281 निगेटिव्ह आले आहेत. 6 हजार 305 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 हजार 163 रूग्ण उपचार घेत आहेत.

असे आहेत करोनामुक्त

विभाग संख्या टक्के

* नाशिक 1964 54.63

* मालेगाव 913 81.74

* उर्वरित जिल्हा 863 59.23

* जिल्हा बाह्य 96 70.59

* एकूण 3836 60.64

Deshdoot
www.deshdoot.com