सिन्नर करोना
सिन्नर करोना
नाशिक

सिन्नर तालुक्यात 'करोना'चा पाचवा मृत्यू

रुग्ण संख्या १८८ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर | प्रतिनिधी | Sinner

तालुक्यातील शिवडे येथील 85 वर्षीय वृद्धेचा शनिवारी (दि.4) मृत्यू झाल्याने तालुक्यात 'करोना' संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

आज (दि.6) सिन्नर शहरात दोन रुग्ण आढळून आले असून शनिवारी (दि.4) शहरात एक रुग्ण आढळून आला होता. शिवडे येथील ही वृध्दा विंचूर दळवी येथे मुलीकडे काही दिवस राहिली होती. तिला नाशिक येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर विंचूर दळवी येथे संपर्कात असलेल्या चौघांना 'करोना'चा संसर्ग झाल्याचा अहवाल आला होता. या वृद्धेच्या मृत्यूनंतर तालुक्यातील मृतांची संख्या पाच वर पोहोचली आहे.

रविवारी (दि.5) अपेक्षेप्रमाणे मोह व शिवडे येथील प्रत्येकी तीन रुग्णांना 'करोना' चा संसर्ग झाल्याची अधिकृत माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली. मात्र त्याचवेळी सिन्नर शहरातील काजीपुरा येथील महिलेला 'करोना' चा संसर्ग झाल्याचा अहवाल खाजगी लॅबकडून येऊनही तशी माहिती आरोग्य विभागाने दिली नाही.

आज (दि.6) तालुक्यातील 14 सशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उद्योग भवन परिसरातील 33 व 45 वर्षीय पुरुषांना 'करोना' चा संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे.

त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 188 झाली आहे. त्यातील 117 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपजिल्हा रुग्णालयात 52 व नाशिकच्या शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com