युरिया खत
युरिया खत
नाशिक

इगतपुरी : बांधावर तर दूरच, दुकानातही मिळत नाही खत!

युरीया, डिएपी खतांची टंचाई

Gokul Pawar

Gokul Pawar

कवडदरा । kawaddara

इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिपंळगाव, घोटी खुर्द परीसरात खताची तीव्र टंचाई जाणवत आहे. बांधावर तर दूरच परंतू दुकानात देखील युरीयाची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांवर युरीयासाठी भटकंतीची वेळ आली आहे. परीसरात सर्वदूर हीच परिस्थिती असून टंचाईआड बोगस खते खपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात होणार नाह. याकरिता थेट बांधावर निविष्ठा पोचविण्याची संकल्पना कृषीमंत्री दादा भुसे यांनी मांडली होती. सुरवातीला या संकल्पनेला चांगले पाठबळ मिळाले. त्यानंतर मात्र अनेक भागात निविष्ठा टंचाईची समस्या भेडसावू लागली. युरीया, डिएपी खताची मात्र तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. रेल्वेच्या रेक पॉईंटमुळे ही समस्या उदभवल्याचे सांगत कृषी विभाग, दुकानदार यांच्या मार्फत असे सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था प्रभावीत झाल्याने खताचा पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे देखील परीसरात खतटंचाई गडद झाल्याचे सांगीतले जाते. परंतू याचा खरिप हंगामावर परिणाम झाला आहे.परीसरात मोठ्या प्रमाणात खरीप मधील भात पिकाची लागवड सुरू आहे. तण नियंत्रणाचे कामही अनेक शेतकऱ्यांनी केले आता पिकाच्या वाढीसाठी खताची गरज असताना तेच मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

खताची टंचाई भासवित बोगस खते शेतकऱ्यांकडे खपविली जात आहेत. परिणामी आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. बांधावर तर दूरच परंतू दुकान गेल्यावरही खत मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. हंगामात कृषी सहाय्यकांनी मार्गदर्शनासाठी शेतावर जाण्याची गरज असताना ते सुध्दा फिरकत नाही. शासनाने इतर जबाबदाऱ्या सोपविल्याचे ते सांगतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे? कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्‍न आहे.

- संतोष निसरड, शेतकरी कवडदरा

अनेक ठिकाणी बोगस निविष्ठांची विक्री होत आहे. कृषी खात्याची गुणनियंत्रण यंत्रणा या प्रकारावर आळा घालण्यात अपयशी ठरल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी बोगस बियाणे तर काही ठिकाणी जादा दराने खताच्या विक्रीचे प्रकार घडतच आहेत.'

- प्रकाश सहाणे, शेतकरी

Deshdoot
www.deshdoot.com