नाशिक
रस्ता अपघातात तरस ठार
त्रंबकेश्वर l Trambakeshwar
आज (दि. ०१ मार्च) रोजी पहाटे तीनच्या सुमारास त्रंबकेश्वर जव्हार महामार्ग क्र. ८४८, सापगाव फाटा शिवार येथे तरस मादी वय अदांजे ३ ते ४ वर्ष रस्ता अपघातात मृत अवस्थेत आढळून आली.
या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पंचनामा, व पशुधन विकास अधिकारी श्रेणी-१ ता. त्रंबकेश्वर यांच्या कडून शव विच्छेदन करण्यात आले. त्या नंतर शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.