कुलगुुरु नितीन करमळकर यांचा सत्कार

कुलगुुरु नितीन करमळकर यांचा सत्कार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ( Savitribai Phule Pune University ) माध्यमातून आपल्याला पाच वर्षांत चांगला आदर्श कर्तृत्ववान विद्यार्थी घडवण्याचे भाग्य लाभले. सर्वांच्या साथीने त्यात ब़र्‍यापैकी यश मिळाले. मिळालेल्या संधीचे सोने करता आले, अशा शब्दांत मावळते कुलगुरु नितीन करमळकर ( Nitin Karmalkar ) यांनी आज कृतज्ञता व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मावळते कुलगुुरु नितीन करमळकर हे निवृत्त होत असल्याबद्दल त्यांंचा व त्यांच्या सहकार्यांचा हृद्यसत्कार आज रावसाहेब थोरात सभागृहात अशोकचक्र विजेते मेजर जनरल सायरस आदी पीठावाला यांंच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना करमळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. अभिनेेते लेखक दीपक करंजीकर प्रमुख अतिथी होते. यावेळी करमळकर, प्र. कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, अधीष्ठाता मनोहर चासकर, पराग काळकर, अंजली कुरणे, संजीव सोनवणे, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांचा सत्कार करण्यात आला.

करमळकर पुढे म्हणाले की, ज्या संंस्थेत शिक्षक म्हणून काम केले, त्यात संस्थेेचा कुलगुरु म्हणूण निवृत्त होत आहे. पाच वर्षात नवी वाट शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गरीबातील गरीब विद्यार्थ्यालासुध्दा उच्च दर्जाचे शिक्षण अल्पदरात मिळाले पाहिजे, यासाठी विविध विद्यापीठाशी करार करुन अल्पदारत ते उपलब्ध करुन देण्यात या काळात यश मिळाले. यामुळे या विद्यापीठाचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करु शकेल. अशी शक्यता निर्माण झाली. सर्वांच्या साथमुळे हे शक्य झाले. यावेळी करंजीकर यांनी करमळकर यांच्या विद्याार्थीभिमुख कार्याचे कौतुक केले.

पवार म्हणाल्या, शहरी व ग्रामीण भागातील शैक्षणिक दरी करमळकर यांनी कमी केली. साधी राहणी व उच्च विचाारसणीचा आदर्श ठेऊन सदैव नाशिक, नगरमधील शिक्षण संस्थांना मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पिठावाला यांनीही करमळकर व त्ंयांच्या सहकार्यांना निवृत्तीच्या् शुभेच्छा देऊन त्यांनी विद्याविभूषीत पिढी घडवून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोठा हातभार लावला, असे ते म्हणाले. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांंनी प्रास्ताविक केले. प्रा. जयदीप निकम यांनी परिचय करुन दिला. यावेळी संचालक सचिन पिंगळे यांनी स्वागत केले. उमेश राऊत, तुषार पाटील, राजेंद्र नवले, परशराम वाघेरे आदींसंह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com