
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील नामांकित असलेल्या नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (NIMA) चा वर्धापनदिन मंगळवार (दि.24 जानेवारी) दुपारी 4 वाजता निमाच्या कार्यालयात साजरा होणार आहे.
याचे औचित्य साधून संस्थेचे माजी अध्यक्ष आणि पदाधिकार्यांचा सत्कार सोहळा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्नेहमिलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.
दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच हा जाहीर कार्यक्रम होत असल्याने उद्योजक सुखावले आहेत.माजी अध्यक्ष आणि पदाधिकार्यांच्या सत्काराबरोच माध्यम प्रतिनिधींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे स्नेहमिलन सोहळ्याने या कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.
वर्धापनदिनाच्या यशस्वीतेसाठी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, किशोर राठी, मानद सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष विरल ठक्कर, सचिव हर्षद ब्राह्मणकर आणि सर्व नूतन विश्वस्त प्रयत्नशील आहेत.