उत्तरांच्या हरकती नोंदवण्यासाठी आयोग आकारणार शुल्क

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक । Nashik

एमपीएससी (mpsc) तर्फे सध्या अनेक निर्णय घेण्याची शृंखला सुरू आहे. यातच आयोगाने काल एक महत्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संमिश्र प्रतक्रिया उमटत आहेत. उत्तरपत्रिकांवर ऑनलाइन (online) पद्धतीने हरकती (Objections) (आक्षेप) नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता प्रतिप्रश्न १४४ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या चुकलेल्या उत्तरावर न्याय मिळण्यासाठी पैसे (money) खर्च करावे लागणार आहे...

एमपीएससी'कडून विविध सरकारी पदांसाठी (government posts) पदभरती परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा घेतल्यानंतर एमपीएससीकडून उत्तरतालिका प्रसिद्ध केल्या जातात. गेल्या काही महिन्यांत या उत्तरतालिकांमधील उत्तरे चुकत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे या चुकलेल्या उत्तरांवर विद्याथ्र्यांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले जातात. या आक्षेपांची संख्या मोठी असल्याने, तसेच त्यातील काही आक्षेप योग्य निघत असल्याने 'एमपीएससी'ला नव्याने उत्तरतालिका प्रसिद्ध कराव्या लागत आहेत. त्यातही काही उत्तरांमध्ये चुका होत असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. त्यामुळे निकाल जाहीर करण्यात विलंब होत आहे.

या निर्णयानुसार उत्तरतालिकांवर ऑनलाइन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी १०० रुपये प्रतिप्रश्न आणि अधिकचे ४४ रुपये सेवाशुल्क असे एकूण १४४ शुल्क लागू करण्यात येत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक जुलै २०२२ पासून करण्यात येणार असल्याचे 'एमपीएससी'कडून स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे अनावश्यक हरकतींना आळा बसणार आहे, मात्र एमपीएससी शुल्क घेणार असल्यास, एमपीएससी'ने आता एक महिन्याचा आत दोन्ही उत्तरतालिकांसहीत प्रत्येक परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होईल अशा धोरणाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या ( एमसीक्यू ) परीक्षांच्या प्रथम उत्तरतालिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने हरकती नोंदवण्याची सुविधा एमपीएससीने करून दिली आहे. हरकती नोंदवताना उमेदवारांकडून सामूहिक पद्धतीने हरकती नोंदविण्यात आल्याचे वारंवार निदर्शनास आले . त्यामुळे छाननीप्रक्रिया, दुरुस्ती यात बराच वेळ जातो. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रामाणिक, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यानिशी हरकती दाखल होण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे एमपीएससी'कडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com