कालिका मंदिरात दर्शनासाठी नवरात्रात भरावे लागणार शुल्क

कालिका मंदिरात दर्शनासाठी नवरात्रात भरावे लागणार शुल्क

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे ग्रामदैवत असलेले कालिका मंदिर संस्थान Kalika Mandir Trust पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन यांची संयुक्त बैठक कालिका मंदिर सभागृहात संपन्न झाली. यामध्ये मंदिरात प्रवेशाकरिता शंभर रुपयाची टोकण पध्दती One hundred rupees token system for entering the temple ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनातर्फे घेण्यात आला.तर यंदाही यात्रा भरणार नसल्याने नाशिकरांत नाराजी पसरणार आहे.

7 ऑक्टोबर पासून राज्य शासनाच्या आदेशानुसार मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आणि तेव्हापासूनच नवरात्र उत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये करोणाचा प्रादुर्भाव पसरू नये याकरिता करोना निर्बंध अद्यापही कायम असल्याने पोलीस प्रशासनातर्फे कालिका मंदिर परिसरामध्ये गर्दी होणार नाही याकरिता करण्यात येणाऱ्या उपाय योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मंदिरांमध्ये गर्दी होणार नाही याकरिता टोकण पद्धती करावी असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले होते. यावर मंदिर प्रशासनाने टोकण पद्धतीत प्रत्येकी शंभर रुपये असा दर दर्शनासाठी आकारण्याचे सांगितले, तर यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणेच मंदिराच्या बाहेर कुठल्याही प्रकारचे दुकाने लागणार नाही याची काळजी घेण्याचे पोलीस प्रशासनातर्फे मंदिर प्रशासनाला सांगण्यात आले. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी करोणा नियमांचे पूर्णपणे पालन करण्याकरिता मंदिर प्रशासनातर्फे उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वपोनी भागिरथ देशमुख, अग्निशामक दलाचे शाम राऊत, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, संस्थानिक दत्ता पाटील, सुभाष तळाजिया, डॉ. प्रताप कोठावळे, संतोष कोठावळे, सुरेंद्र कोठावळे, विशाल पवार, राम पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.