
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि काही ठिकाणी होणाऱ्या गारपिटीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे हे संकट कधी ओसरेल असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सोमवार दि.२० मार्चपर्यंत कोकण वगळता राज्यात तूरळक ठिकाणी वीजा आणि वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. विदर्भात शुक्रवारी (दि.१७) गारपीट होऊ शकते. सध्य:स्थित व्यापक प्रणालीमुळे सध्याचे पावसाळी, ढगाळ वातावरण निवळणी( स्वच्छ होणे)साठी अजुनही चार दिवस लागण्याची शक्यता आहे. मंगळवार (दि.२१)पासुन वातावरण निवळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
दुपारचे तापमानही घसरेल
संपूर्ण महाराष्ट्रात येणारे काही दिवस दुपारच्या कमाल तापमानात (temperature) दोन डिग्रीने घसरण होण्याची शक्यता जाणवते व ही स्थिती पुढील ५ दिवस राहण्याची शक्यता जाणवते,असेही खुळे यांनी सांगितले.