रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांत भीती

रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांत भीती

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील वडझिरे शिवारात रसायनयुक्त पाणी (Chemical water) व कचरा (Garbage) टाकला जात असल्यामुळे या शिवारातील संपूर्ण पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाण्यामुळे वन्यजीवांबरोबरच सर्वसामान्यांचे आरोग्यही (Health) धोक्यात आले आहे.

डोंगरा भोवतालच्या शेतकर्‍यांनाही यामुळे मोठा फटका बसत असून संबंधित विभागाने औद्योगिक कचरा (Industrial waste) व पदूषीत पाणी (Polluted water) परिसरात सोडणे थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वडझिरे-माळेगाव एमआयडीसी (MIDC) रस्त्यावरील घाटात गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसीतील काही कारखान्यांकडून केर कचरा, केमिकल (Chemical), दुर्गंधीयुक्त पाणी, खराब दूध टँकरद्वारे सोडले जात आहे.

हे पाणी व कचरा डोंगरावरून वडझिरे शिवारातील शेतापर्यंत पोहचल्याने संपुर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रसायनयुक्त पाणी शिवारातील बंधार्‍यांमध्ये व नाल्यांमधील पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे वन्यजीवांसह सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे शेतकर्‍यांनी (Farmers) सांगितले.

हे रसायनयुक्त पाणी विहिरीत उतरले तर परिसरातील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकाराची पाहणी करून हा प्रकार थांबवण्याची मागणी सरपंच सुनीता आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके, ग्रामविकास अध्यक्ष अशोक नागरे, भास्कर ढोंबरे, शिवाजी बोडके, बाळू बोडके, भिमराव दराडे, रामेश्वर बोडके, पांडुरंग बोडके यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com