नाशिक । Nashik

वडिलांच्या विवाहबाह्य संबधांच्या आड येणाऱ्या मुलाचा गळा दाबून दाबून खून केल्याची घटना आज नाशिक शहरात घडली. या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, वडील प्रभाकर माळवाड हे देवळा तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा निलेश आईसह भक्तीसिद्धान्त बिल्डिंग, जनरल वैद्य नगर तुलसी आय हॉस्पिटल येथे वास्तव्यास होते.

वडील शनिवार रविवार नाशिकला घरी येत असत. यादरम्यान, वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले होते. काही दिवसांनी वडिलांपासून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेला दोन मुले असल्याचे समोर आले. गेल्या वर्षीच वडिलांची दीड एकर जमीन या महिलेच्या नावे केली होती.

यावरून मुलगा निलेश व वडील प्रभाकर यांच्यात नेहमीच वाद होत असत. दिवसेंदिवस मुलगा व वडील यांच्यात वाद विकोपाला गेलं होते. वडील नेहमी मुलाला धमकावत होते. दोन दिवसापूर्वी वडील प्रभाकर नाशिक मध्ये आल्यानंतर मूलाने मला पोल्ट्री फार्म टाकून हवा आहे, असा तगादा लावला.

यावरून दोघांमध्ये पुन्हा एकादा कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे आज (दि ०४) पहाटे संतापलेल्या वडिलांनी मुलाचा गळा आवळून खून केला. व मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवला होता.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात आईच्या फिर्यादीवरून वडील प्रभाकर याच्याविरोधात गुन्हा दाखल् करण्यात आला आहे.