
नाशिक | Nashik
येथील अंबड परिसरातील (Ambad Area) एक्सलो पॉईंट येथे वारंवार किरकोळ कारणावरून मुलगी घर सोडून जात असल्याचा राग अनावर झाल्याने पित्याने मुलीचा गळा आवळून खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योती रामकिशोर भारती (२४) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून ती घरात होणाऱ्या किरकोळ कारणाच्या भांडणावरून घर सोडून निघून जात असल्याने तिच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत होता. त्यामुळे तिचे वडील रामकिशोर भारती यांना राग अनावर झाल्याने त्यांनी राहत्या घरात तिचा गळा आवळून खून केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Chandrakant Khandvi) सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक किरण शेवाळे उपनिरीक्षक नाईद शेख आदींसह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच याप्रकरणी संशयित रामकिशोर यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.