मराठा आरक्षणासाठी उपोषण

आगामी निवडणुकांवर बहिष्कार टकण्याचा इशारा
मराठा आरक्षणासाठी उपोषण

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

मराठा समाजाला (maratha community) आरक्षण (Reservations) देण्याच्या मागणीसाठी खा. छत्रपती संभाजी राजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मुंबईच्या (mumbai) आझाद मैदानावर (Azad Maidan) सुरू केलेल्या उपोषणाला

पाठींबा देण्यासाठी शहरातील मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज देखील मैदानात उतरला असून त्यांनी आक्रमक भूमिका घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ (Dr. Babasaheb Ambedkar statues) उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षणासोबत इतर सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुकांवर (election) बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. आंदोलनाला (agitation) विविध राजकीय पक्षांसह (political party) सामाजिक संघटनानी पाठींबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर पाच मुख्य मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खा. संभाजी राजे यांनी आजपासून मुंबईत (mumbai) अन्नत्याग आंदोलन (agitation) सुरु केले आहे.

त्यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शहरातील मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha), सकल मराठा समाज व इतर समाजबांधवांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ उपोषण सुरु केले आहे. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी एक मराठा..लाख मराठा, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा हा भिजत पडला असून अनेक आंदोलने करण्यात आल्यानंतर देखील ही मागणी मान्य केली जात नाही. त्यामुळे आता आमचा संयम सुटत चालला आहे. केंद्र व राज्य शासनाने तातडीने आरक्षणासह इतर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू, असा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे.

आंदोलनात भास्कर झाल्टे, रामदास दुभासे, भीमराज लोखंडे, हेमंत गवळे, रवींद्र नाठे, विष्णू चव्हाण, विनोद डमरे, कांतीलाल येणारे, किरण घुमारे, किशोर कदम, नाना शिंदे, सुरेखा झाल्टे, रेखा येणारे, सुवर्णा निकम, सुरेखा धुमाळ, मंगला जाधव, कविता डमरे, समृद्धी झाल्टे, अक्षय देशमुख आदिंसह मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com