राजे संभाजी स्टेडियमचे काम रखडल्याने उपोषण

खासदार व मनपा अधिकार्‍यांची मध्यस्थी; उपोषण मागे
राजे संभाजी स्टेडियमचे काम रखडल्याने उपोषण

नवीन नाशिक । प्रतिनिधी Nashik

नवीन नाशिक राजे संभाजी स्टेडियमचे( Raje Sambhaji Stadium )काम गेल्या दोन ते अडीच वर्षापासून रखडल्याने नगरसेवक किरण दराडे ( corporator Kiran Darade ) व त्यांचे पती बाळा दराडे यांनी संभाजी स्टेडियम मध्ये आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान खासदार व मनपा अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्याने दराडे दाम्पत्याने उपोषण मागे घेतले.

खेलो इंडिया खेलो अंतर्गत सहा कोटी रुपये खर्च करून संभाजी स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या कामाचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मात्र हे काम सुरू करून दोन ते अडीच वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापपर्यंत येथील काम रखडल्याने संभाजी स्टेडियमची दुरवस्था झाली आहे.

दरम्यान सदर कामासाठी अधिकारी हे लोकप्रतिनिधींना कुठल्याच प्रकारची दाद देत नसल्याचा आरोप करीत नगरसेविका किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी संभाजी स्टेडियम येथील इंडोर स्टेडियमच्या बाहेर आमरण उपोषणास सुरवात केली.

दरम्यान या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे, मनपाचे शहर अभियंता संजय घुगे. नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉक्टर मयुर पाटील. कनिष्ठ अभियंता एजाज काझी आदींसह अधिकार्‍यांनी उपोषणाच्या जागी येत येत्या दहा दिवसांच्या आत सदर कामाची नवी निविदा काढण्यात येईल व लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर दराडे दाम्पत्याने उपोषण मागे घेत कामाची निविदा जर दहा दिवसात काढली नाही तर आयुक्तांच्या दालनासमोर आमरण उपोषणाला बसण्याचे अधिकार्‍यांना सुचित केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com