
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
तालुक्यातील पांगरी (pangri) येथे उद्भवलेल्या गंभीर पाणीप्रश्नी (water issue) 25 मे पासून प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषण (Fast unto death) करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अरुण पांगारकर (Social worker Arun Pangarkar) यांनी दिली.
यासाठी मुख्यमंत्री (Chief Minister), पाणीपुरवठा मंत्री (Minister of Water Supply), खासदार (MP), आमदार (MLA), जिल्हाधिकारी (Collector), तहसिलदार (Tehsildar), ग्रामपंचायत व पोलिसांना निवेदन (memorandum) पाठवण्यात आले आहे.
पांगरीतील पाणीप्रश्नाने अत्यंत गंभीर रूप धारण केले असून पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी दरमहा तब्बल 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत. सर्व-सामान्यांनी एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न निवेदनात करण्यात आला आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठयाच्या योजना (water supply schemes) राबवल्या खर्या! पण, त्यांना भ्रष्टाचाराची (Corruption) कीड लागल्याचा आरोप पांगारकर यांनी केला आहे.
ग्रामस्थांना सवलतीच्या दरात पाणीपुरवठा (water supply) व्हावा, योग्य उपाययोजना कार्यान्वित होईपर्यंत त्यांच्या मासिक पाणी खर्चातील 75 टक्के हिस्सा शासनाने उचलावा. त्यासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आपापल्या निधीतून सहाय्य करावे,
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार करोडो रुपये खर्च करुनही पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरलेल्या योजनांची चौकशी करावी, जनतेला पाणी विकत घेण्यासाठी कर्जसुविधा उपलब्ध करुन द्यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती पांगारकर यांनी दिली.