पेठ : शेतखळे नामशेष होण्याच्या मार्गावर

शेतकर्‍यांकडून शेतातच मळणी
पेठ : शेतखळे नामशेष होण्याच्या मार्गावर

मुरुमटी । अशोक तांदळे

पेठ तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस शेतकरी अवगत तंत्रज्ञान तसेच पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल युगाची कास धरत शेतीत बदल करू लागला आहे.

नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून उत्पादन वाढीकडे कल झुकवीत असून शेती उत्पादकतेमधून लाखोंचे उत्पादन आणि नशीब आजमावत आहे. त्यात पेठ तालुक्यातील शेतकर्‍यांचाही समावेश आहे.

पेठ तालुक्यातील शेतकरी आंबा, काजू, मोगरा, अप्पल बोर, कलिंगड सारख्या शेती बदलामुळे लाखोंचे उत्पादन पदरी पाडून घेत आहे. एकीकडे नवीन तंत्रज्ञान तर दुसरीकडे नामशेष होत चाललेली पारंपरिक शेतीपध्द्ती दिसून येत आहे. याचाच प्रत्येय शेती पद्धतीतील साठवणूक करणारी शेतीखळी होय.

मात्र तंत्रज्ञान शेती अवजारेमुळे पारंपारिक खळी ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी गावच्या शिवारात अथवा गावठाण जागेत गावकर्‍यांनी गोलाकार आकारात निर्माण एकत्र साठवण केलेल्या शेती पिकाच्या मळणीसाठी तयार केलेले खळे असायचे.

गावच्या वेशीपर्यंतचे पीक या तयार केलेल्या खळ्याभोवती गोलाकार आकारात साठवून ठेवत सवडीनुसार ती शेतकरी पिकाची मळणी करत असायचा.मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या अवगत शेती अवजारांमुळे शेतातच शेताच्या बांधावर शेतकरी मळणी करू लागल्याने पारंपरिक शेती पद्धतीतील खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

तर दुसरीकडे शेतकरी खळ्याऐवजी शेताच्या बांधावरच सोंगणी केलेल्या पिकाची साठवण करून ठेवत आहे. दिवसेंदिवस पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत तसेच अवगत शेतीमुळे शेतकरी भात, नागली, वरईची पिके शेती अवगत अवजारांमधून मळणी करतांना दिसत आहे. काही ठिकाणी शेतकरी शेतातच भाताची झोडपणी करून घेत आहे.

दिवसेंदिवस वातावरणीय बदलामुळे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा ऋतुत बदलाचे वारे वाहू लागले असल्याने भर उन्हाळ्यातही पाऊस हजेरी लावतानाचे अनुभवयास आले आहे. यामुळे वातावरणीय बदलाचा फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. यामुळे कधी शेती अवजारांच्या सहाय्याने तर कधी मजुरांच्या झोडपणीच्या माध्यमातून शेतकरी मळणी करू लागल्याने पारंपरिक शेती खळे काही ठिकाणी अडगळीच्या जागेत आहेत.

तर काही ठिकाणी शेतकरी ताडपत्रीच्या सहाय्याने ट्रॅक्टरद्वारे मळणी करून घेत असल्याने शेतीखळ्याना नामशेष होण्याची गती प्राप्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com