जनावरांना होणाऱ्या आजारांमुळे शेतकरी चिंतेत

जनावरांना होणाऱ्या आजारांमुळे शेतकरी चिंतेत

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

.जनावरांवरील लम्पी आजाराने ( Lampi Diseases on animals )आदिवासी भागात धुमाकुळ घातला असुन त्यामुळे आदिवासी शेतकरी धास्तावला आहे.शासनाने त्वरीत गाव पातळीवर पशुवैदयकिय सुविधा ( Veterinary facility )पुरवावी अशी मागणी शेतकर्‍यांनी ( Farmers Demand ) केली आहे.

दिंडोरीच्या पुर्व पट्टट्यात पुर्वी लम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आला. प्रगत शेतकर्‍यांकडील जनावरांना हा आजार झाल्यानंतर त्यांना तत्काळ सुविधाही मिळाल्या. उपचारही झाले. पश्चिम भागात मात्र आता लम्पीचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढला आहे. जनावरांना गाठी आल्या आहेत. जनावरांचे हाल शेतकर्‍यांना पहावत नाही. त्यात पशुवैदयकिय दवाखाने कमी असल्याने सर्वच गावांना जनावरांचे डॉक्टर पोहचु शकत नाही. त्यामुळे अनेक जनावरे अजुनही उपचारापासुन वंचित आहे.

त्यात खाजगी पशुवैदयकिय व्यावसायिकांची मदत शेतकर्‍यांना होत आहे. ते वेळेवर शेतकर्‍यांसाठी धावुन जात आहे. आदिवासी भागात लम्पीला जनावरांचा करोना म्हणुन आता बोलल्या जात आहे. कारण लम्पी जनावरांच्या शरीरातुन निघुन जाण्यास एक महिना लागत आहे. त्यांनाही लस दयावी लागत आहे. अनेक जनावरांना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. तरीही गाव पातळीवर संसर्ग झालेला दिसुन आहे. करंजाळी परिसरात रामचंद्र माळेकर, जगन माळेकर, पुंडलिक माळेकर, तुकाराम पिठे, दौलत पिठे, दौलत महाले, देवराम महाले आदींच्या जनावरांना लम्पीने गाठले आहे.

दिंडोरी शहरातही अनेक शेतकर्‍यांच्या जनावरांवर लम्पीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. यावर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून शेतकरी उपचार करुन घेत आहे. तथापि प्रभावी लस नसल्याचे अनेक शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनापुढे अडचणी वाढल्या आहे. अजूनही शेतकर्‍यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे.

दिंडोरी शहरासह तालुक्यात अनेक पाळीव प्राण्यांना लम्पी रोगांची लागण झालेली आहे. अगोदरच शेतकरी करोनामुळे त्रस्त झाला आहे. शेतीमालाला भाव नाही. त्यात आता जनावरांनाही लम्पीची लागण झाल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी लसीकरण मोहीम राबवावी.

सीताराम जाधव, शेतकरी दिंडोरी

लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही सर्व शेतकर्‍यांना लम्पी ग्रस्त जनावरे विलगीकरणात ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहे. घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसून वेळीच औषधोपचार जनावरांना द्यावा. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे.

डॉ. ज्ञानेश्वर गांगुर्डे, दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com