ऊसाला तुरे फुटल्याने शेतकरी चिंतेत

साखर उतार्‍यात घट; उत्पादकांना आर्थिक फटका
ऊसाला तुरे फुटल्याने शेतकरी चिंतेत

लखमापूर । वार्ताहर | Lakhmapur

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) पश्चिम भागात ऊस पिकांना (sugarcane crop) तुरे फुटल्याने बळीराजासमोर (farmers) नवीन संकट उभे राहिले असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. ऊसाला तुरे फुटल्याने आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

एका बाजूला ऊस तोडणी सुरू झाली असली तरी दुसर्‍या बाजूला तालुक्यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाला तुरे येत असल्याचे दिसत आहे. करोना (corona) महामारीमुळे आधीच अडचणीत असणारा शेतकरी (farmers) परतीच्या पावसाने झालेले नुकसान आणि त्यातच आता ऊसाला फुटलेल्या तुर्‍यामुळे आणखीच अडचणीत येण्याची शक्यता वाटत आहे. अवकाळी पावसाने (Untimely rain) काही ठिकाणी ऊस भुईसपाट झाले होते. या पडलेल्या ऊसाला देखील फुटवे फुटले आहे.

या सर्वांमुळे ऊसाच्या वजनात होणारी घट अटळ असल्याने दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) शेतकर्‍यांनी अशा ऊसांची लवकर तोडणी करावी, अशी मागणी केली आहे. कारखानाच्या गळीत हंगामाला सुरूवात झाली आहे. परंतु यावर्षीचा हंगाम शेतकर्‍यांसमोर अनेक संकटे घेऊन आला आहे. अवकाळी पावसाने भात, सोयाबीन, पिकांला फटका दिलाच परंतु आता ऊस शेतीची अवस्था देखील बिकट होण्याच्या मार्गावर दिसत आहे.

गळीत हंगामाच्या काळातच उसाला तुरे फुटले आहे. वातावरण बदलावाचा (Climate change) आणखी एक परिणाम म्हणजे पाऊस काळात आलेल्या वादळी वार्‍यामुळे पडलेल्या ऊसाला फुटवे आल्याचे काही भागात आढळून आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर क्रमपाळीची वाट न पाहता तातडीने तुरे फुटलेल्या उस पिकांचे निरीक्षण करून तो लवकरात लवकर कसा तोडला जाईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

यंदा पावसाने आपली सरासरी पुर्ण केल्याने दिंडोरी तालुक्यात सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ही बाब लक्षात घेऊन शासनाने साखर कारखाने (Sugar factory) लवकर सुरू केली. परंतु ऐन गळीत हंगाम बहरत असतांना उसाला कमी कालावधीत तुरे फुटल्याने शेतकरी वर्ग नवीन चिंतेत सापडला आहे.

शीरपेचातील तुरे मानाचे असतात. परंतु ऊसाच्या शेतातील उसावरील तुरे शेतकरी वर्गाच्या आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. आर्थिक संकटांनी होरपळलेल्या बळीराजांला अशा संकटातून तारणे गरजेचे आहे. तुरे फुटलेल्या उसाचे सर्वेक्षण करून कारखान्यांने ऊस तोड करावी म्हणजे शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल.

निखील देशमुख, ऊस उत्पादक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com