वातावरण बदलामुळे शेतकरी चिंतेत; गहू, हरभरा पेरणी लांबणीवर

सुशिक्षित तरुण शेतकरी
सुशिक्षित तरुण शेतकरी

ओझे । विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) सध्या संध्याकाळ पासुन ते आठ वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके (fog) पडत असल्यामुळे बळीराजांवर (farmers) पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून दाट धुके (fog) पडत असल्याने रब्बी हंगामातील (rabbi season) पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. सध्या थंडीचे (cold) प्रमाण कमी व पाणी मिश्रित दाट धुके हे रब्बी हंगामातील नवीन समीकरण तयार झाल्याने पिके कशी वाचवायचे ही समस्या ‘आ’ वासून उभी राहिली आहे. अशाच स्वरूपाच्या सतत बदलणार्‍या वातावरणमुळे गहू (wheat), हरभरा (gram), कांदा (onion) व इतर नगदी पिकाना धोका निर्माण झाला आहे.

अगोदरच कोणत्याच पिकाला भाव नसल्यामुळे बळीराजांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दिवसेंदिवस वातावरणातील बदल हा शेतकरी (farmers) वर्गाच्या प्रगतीला खिळ घालत असल्यामुळे शेती करणे शेतकरी वर्गाला एक प्रकारे आवाहन ठरत आहे. वातावरणातील बदल जर असाच होत राहिला तर बळीराजां कर्जाच्या डोंगरांला बाहेर पडू शकत नाही. असे विचार सध्या जाणकार शेतकरी वर्गातून व्यक्त केले जात आहे.

परतीच्या पावसानंतर (rain) रब्बी हंगामासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले होते. परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील (rabbi season) गहू, हरभरा पिकांची पेरणी लांबली होती मात्र नंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे जमिनीत मशागतीसाठी वापसा नसल्यामुळे सध्या पेरणी लाबणीवर गेली आहे.

ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे आशा ठिकाणी पेरणी करून उगवण झालेला गहू पिवळा पडण्यास सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांवर वातावरणातील बदलावाचे गडद अस्मानी संकट निर्माण झाल्याने मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा बळीराजां आता यामुळे चारी मुंड्या चित होतो की काय ? अशी भीती दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.

खरीप हंगाम (kharif season) परतीच्या पावसाने वाया गेला. त्यामुळे जवळचे सर्वच भांडवल संपून गेलेले असतांना मिळेल त्या ठिकाणीहुन भांडवल उभे करत रब्बी हंगामावर अपेक्षा एकवटून कबंर खचलेल्या बळीराजांला बदलत्या वातावरणाचा व पाणी मिश्रित दाट धुक्याचा परिणाम होऊ नये, म्हणून दिवस रात्र एक करून रब्बी पिके (rabbi crop) वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

सध्या वातावरणात झालेला बदल हा द्राक्ष उत्पादकासाठी अतिशय धोकादायक असून धुक्यामुळे द्राक्षबागावर डावणी, भुरी या रोगाचा धोका वाढण्यास सुरुवात झाली असून द्राक्ष फवारणीत वाढ झाल्यामुळे सहाजिकच औषधाचा खर्च वाढणार आहे. अनेक हवामान तज्ञांकडून 16 डिंसेबरपर्यंत हे वातावरण राहणार असून नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी पावसाची शकता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्याप्रमाणे बदलत्या वातावरणामुळे आधीच बाजार नसलेले टोमॅटो पिवळे पडले आहे. शेतकरी वर्गाने टोमॅटो काढून टाकण्यास सुरुवात केली आहे त्यात तालुक्यात अनेक ठिकाणी दिवसा वीज बंद व रात्री वीज चालू या उलट्या धोरणामुळे शेतकरी वर्गाची डोके दु:खी अजूनच वाढत आहे.

शेतकरी हतबल

सध्या पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे त्यांचा परिणाम द्राक्षे, कांदा, टोमॅटो, गहू, हरबरा तसेच सर्व प्रकारचा भाजीपाला व इतर नगदी पिके यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव रूपाने दिसत आहे. त्यात करपा, मिलीबग, चिकटा, डावणी, घडांना तडे जाणे, घडामध्ये पाणी थांबल्याने घड कुंजण्याचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच खर्च जास्त व उत्पन्न कवडी मोल हे उलटे समीकरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाला आहे. टोमॅटो पिकांने साथ न दिल्याने टोमॅटो उत्पादकाचे भांडवलही निघाले नाही टोमॅटोला बाजार वाढेल या आशेवर अनेक शेतकरी अजून खर्च करित आहे मात्र या वातावरणामुळे बळीराजाची आशा फोल ठरताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com