परदेशी कांदा आयात करणाऱ्यांचा कांदा उत्पादक शेतकरी करणार 'करेक्ट कार्यक्रम'

भारत दिघोळे आक्रमक
परदेशी कांदा आयात करणाऱ्यांचा कांदा उत्पादक शेतकरी करणार 'करेक्ट कार्यक्रम'

करंजी खुर्द | वार्ताहर Karanji khurd

बोगस बियाणे (Duplicate seed), प्रतिकुल हवामान (Climate change), अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) आणि ढगफुटी सदृश्य पावसाने खरिपाच्या लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. (onion damaged due to rain) एकीकडे कांदयाचे बाजार वाढण्याची शक्यता असताना अनेक व्यापारी, आडतदारांनी बाहेरच्या देशातील कांदा आयात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव पडले आहेत. ज्या व्यापाऱ्यांनी बाहेरून कांदा आयात केला आहे. त्यांना यापुढे शेतकरी कांदा देणार नसल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी सांगितले आहे...

गेल्या 6-7 महिन्यांपासून साठवणूक केलेल्या उन्हाळी कांदा निम्यापेक्षाही अधिक सडल्याने आता शिल्लक उन्हाळी कांद्यासह नवीन लाल कांद्याचेही बाजार भाव वाढण्यास सुरुवात झाली होती.

यातच केंद्र सरकारने इराण (Iran), तुर्की (Turkey), अफगाणिस्थानसह (Afghanistan) ईतर देशातील कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील काही आयातदारांनी कांदा आयात करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या कांद्याला भाव कमी मिळत असून शेतकऱ्यांचा कांदा 50 रुपये प्रति किलोऐवजी सरासरी 22-25 रूपये बाजार भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मुंबई आणि महाराष्ट्रातील ज्या- ज्या आयातदार अडते व्यापारी यांनी परदेशी कांदा आयात केला आहे

त्या-त्या कांदा उत्पादक शेतकरी विरोधी व्यापाऱ्यांची (संपूर्ण महाराष्ट्रातील) यादी, नाव, गाळा नंबर, मोबाईल नंबर तसेच फोटो सर्व महाराष्ट्रात फेसबुक ग्रुप व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कांदा उत्पादक शेतकरी अशा आयातदार, आडते, आणि व्यापारी यांचा योग्य तो बंदोबस्त शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटनाच करणार असल्याचे संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, यापुढे परदेशी कांदा आयात करणाऱ्यांना एकही कांदा उत्पादक शेतकरी कांदा देणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com