रासाका सुरू झाल्याने शेतकर्‍यांना लाभ : आ. बनकर

रासाका सुरू झाल्याने शेतकर्‍यांना लाभ : आ. बनकर

पालखेड मिरचीचे । वार्ताहर | Palkhed

ऊस उत्पादकांच्या (Sugarcane growers) भावना, दु:ख जाणुन घेऊन बंद असलेल्या चुली पुन्हा पेटाव्या या उद्देशाने स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंतने

कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (Karmaveer Kakasaheb Vagh Cooperative Sugar Factory) भाडेत्वावर चालविण्यास घेऊन उत्पादक, कामगार वर्ग, ऊसतोडणी मजुर, रासाका (RASAKA) कार्यक्षेत्रावरील छोटे-मोठे व्यवसायधारकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याने या सर्व घटकांना सुगीचे दिवस आले असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी केले आहे.

स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने भाडेतत्वावर घेतलेल्या रासाकाच्या 40 व्या बॉयलर अग्नि प्रतिपादन सोहळ्याप्रसंगी आमदार बनकर बोलत होते. 5 हजार गाळप क्षमता असलेले कारखाने भाडेत्वावर अथवा सहकारात चालविणे शक्य नाही. रासाका (RASAKA) फक्त 12,500 क्षमता असलेला कारखाना आहे. अशा कठिण परिस्थितीत मागील वर्षी दोन लाखाच्या आसपास गाळप करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

ऊस उत्पादकांनी हे धाडस केले नसते तर दोन लाखाच्या आसपास ऊस शेतातच पडुन राहिला असता. हे धाडस फक्त ऊस उत्पादकांकरीता व शेतकर्‍यांकरीता सर्व संचालकांनी केले. संस्था आज दोन पैसे तोटा खाऊन सर्व ऊस उत्पादक व कामगार वर्गाचे दिवाळी (diwali) पुर्वीच वेळेवर पैसे दिले आहे. मागील वर्षी अनंत अडचणींचा सामन करावा लागला. यावर्षी नविन यंत्रसामुग्रीसाठी कोट्यावधी रूपये खर्च केल्याने 3 लाखाच्या आसपास गाळपाचे उद्दिष्टे आहे. यावर्षी देखील ऊस उत्पादक, कामगार यांनी सहकार्य केल्यास घटकांचे दोन पैसे अधिक वेळेच्या आत देणे शक्य होईल.

कामगारांच्या सहकार्यातून कारखाना नफ्यात आल्यास भविष्यात जास्तीत-जास्त बोनसही देण्यासाठी संस्था विचाराधीन आहे असे आ. बनकर म्हणाले. यावेळी राजेंद्र डोखळे म्हणाले की, तालुक्यातील ऊस उत्पादकांची झालेली चेष्टा संपूर्ण जिल्ह्याने अनुभवली आहे. बंद रासाका सुरू करणे हे मोठे धाडसाचे काम होते. एक कारखाना चालवू शकते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागुन होते. परंतु समाजकारणाची आवड असणारे आ.बनकर यशस्वी झाले. भविष्यात आ.बनकरांसारख्या सक्षम नेतृत्वाशिवाय तालुक्याला पर्याय नसल्याचे डोखळे म्हणाले.

मा.जि.प. अध्यक्ष पंढरीनाथ थोरे म्हणाले की, बनकरांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्वच संस्था नावारूपाला आल्या आहे. रासाकाची बहुतांश यंत्रसामग्री निकामी झाल्याने बनकरांच्या ठिकाणी दुसर्‍या व्यक्तीने हा कारखाना घेतला असता तर यावर्षी हा कारखाना चालू करण्याचे धाडस केले नसते. नफा मिळविणे हा बनकरांचा उद्देश नाही मात्र ऊस उत्पादक, कामगार आणि व्यावसायिकांना न्याय मिळावा यासाठी बनकरांनी हे शिवधनुष्य उचलल्याचे थोरे म्हणाले. याप्रसंगी हरिश्चंद्र भवर, सुरेश खोडे, संस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सोहनलाल भंडारी, विजय बाळासाहेब बनकर, शंकरलाल ठक्कर, निवृत्ती धनवटे, विलास वाघ, माधव ढोमसे, नंदु सांगळे, बाबासाहेब शिंदे, अश्विनी मोगल, सुनीता राजोळे, सोपान खालकर, सिद्धार्थ वनारसे, गणेश बनकर, सागर कुंदे, राजेंद्र शिंदे, राजेंद्र बोरगुडे, गणपत हाडपे, बाळासाहेब वाघ, बळवंत जाधव, विनायक कुशारे, भाऊसाहेब शिंदे, शिवराम रसाळ आदींसह रासाका कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com