हरसूल l देवचंद महाले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खुताडवस्ती-वांगणपाडा (भासवड) येथील शिवराम तुळशीराम खुताडे (४८) हा इसम वाघ नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

शेतीकामासाठी आणलेला बैल सोडून करवळी या गावाहून येत असतांना (दि २१) रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नदीचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाय सरकून वाहून गेला आहे.

घटनेची माहिती मिळताच हरसुल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी खुताडवस्ती व वाघ नदी परिसरात तपासणी केली. दरम्यान २४ तासांपासून तपास सुरु असून अद्याप मृत्यूदेह सापडलेला नाही. परिसरातील गावकरी नदीपात्रात शोधमोहीम राबवत असून, मृत्यूदेहाचा शोध घेत आहेत.

ऐन गणेशोत्सवात खुताडे यांच्या पुराच्या पाण्यात वाहून जाण्याने खुताडवस्ती व परिसरात शोककळा पसरली आहे.