शेतकर्‍यांना ई- केवायसी करण्याचे आवाहन

ई पीक पाहणी
ई पीक पाहणी

पालखेड बं.। वार्ताहर | Palkhed

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत केवायसी (KYC) करून घ्यावी असे आव्हान तलाठी (Talathi) चौरे यांनी केले आहे.

यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध असून सेवा केंद्रावर (Service Centers) जाऊन बायोमेट्रिक (Biometric) सुविधा द्वारे ही केवायसी करता येणार असल्याचे मंडलाधिकारी नंदकुमार गोसावी यांनी सांगितले.

या योजनेत दोन हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी (farmers) कुटुंब लाभार्थी आहेत. प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हा लाभ सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने (central government) इ केवायसी (e-kyc) करणे अनिवार्य केले आहे.

पीएम किसान पोर्टलवरील (PM Kisan Portal) नोंदणी कृतपात्र लाभार्थ्यांची इ केवायसी करण्यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहीम (Awareness campaign) राबवण्यात आली आहे.

प्रक्रिया पूर्ण न करणार्‍या लाभार्थींना पी एम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही, असे निर्देश आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी सूचनेप्रमाणे इ केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन मंडल अधिकारी गोसावी व तलाठी चौरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com